Sonia Gandhi Retirement: छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. भारत जोडो यात्रा ही माझ्या राजकीय खेळीची अखेर आहे, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वक्तव्यावरून त्या लवकरच सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.
कदाचित सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. सध्या त्या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी निवडणूक लढवली नाही तर रायबरेलीतून प्रियांका गांधी-वड्रा निवडणूक लढवू शकतात.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, माझी खेळी भारत जोडो यात्रेसोबतच संपू शकते. भारतातील जनतेला सौहार्द, सहिष्णुता आणि समता हवी आहे, हे सिद्ध झाले आहे. काँग्रेस सध्या कठीण परिस्थितीत आहे.
काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप-आरएसएसने देशातील एकेक संस्था ताब्यात घेऊन ती मोडीत काढली आहे. ठराविक उद्योगपतींना फायदा करून देऊन केंद्र सरकारने आर्थिक संकट ओढवून घेतले आहे.
काँग्रेसने खूप काही साध्य केले, चांगला काळही अनुभवला. पण आता काँग्रेस कठीण टप्प्यातून जात आहे. पूर्वी देशात द्वेषातून महिला, आदिवासी, गरीब, मागासांवर हल्ले होत होते. ते संपवण्याची जबाबदारी आपली आहे. काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक कल्पना आहे. आगामी काळात विजय आपलाच असेल.
2004 आणि 2009 मधील आमचे विजय तसेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले, परंतु मला सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी खेळी भारत जोडो यात्रेने संपुष्टात येऊ शकते. हा काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अशा कठीण काळात काँग्रेस पक्षाला त्यांच्या अध्यक्षपदाची गरज आहे. खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस हा कठीण काळही पार करेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.