INS SindhuKesari: चीन टेन्शनमध्ये! भारतीय नौदलाच्या पाणबुडीने प्रथमच केली 'ही' अचाट कामगिरी

आसियान या आग्नेय आशियातील देशांसोबत संरक्षण सहकार्य वाढविण्यावर भर
INS SindhuKesari
INS SindhuKesariDainik Gomantak

INS SindhuKesari: लडाखमधील हिंसक झटापटीनंतरपासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. तणाव कमी झालेला असला तरी दोन्ही बाजूंनी विविध पातळ्यांवर सतर्कता बाळगली जाते. तथापि, भारतीय नौदलाच्या एका कामगिरीने चीनला धक्का बसला आहे.

भारतीय नौदलाची पाणबुडी INS सिंधुकेसरी प्रथमच दक्षिण चीन समुद्रातून प्रवास करत इंडोनेशियामध्ये पोहचली आहे.

भारतीय पाणबुडीचे इंडोनेशियामध्ये आगमन महत्त्वाचे आहे. कारण चीनने दक्षिण चीन समुद्रात एकतर्फी अनेक बेटे तयार करून आपले सैन्य येथे तैनात केले आहे. अशा स्थितीत दक्षिण चीन समुद्रात भारताच्या पाणबुडीने एवढे दीर्घ अंतर कापले आहे.

INS SindhuKesari
PM Modi In Meghalaya: मोदी, तुमची कबर खोदली जाईल, या टीकेवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी...

दक्षिण चीन समुद्राबाबत चीन आणि आसियान या आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेत वाद आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पाणबुडी जकार्ता येथे पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. इंडोनेशियाचा देखील सागरी सीमेवरून चीनशी वाद आहे.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, 3000 टन डिझेल-इलेक्ट्रिक आयएनएस सिंधुकेसरी बुधवारी सुंदा खाडीमार्गे जकार्ता येथे पोहोचली. भारतीय युद्धनौका नियमित इंडोनेशिया आणि अन्य आशियान देशांचा दौरा करत असतात. पण पहिल्यांदाच एका भारतीय पाणबुडीने शस्त्रांस्त्रांसह दक्षिण चीन समुद्रात दीर्घ अंतर कापले आहे.

गतवर्षी जानेवारीत 375 मिलियनच्या करार करण्यात आला होता त्यानुसार भारत ब्राह्मोस क्षेपणास्त्रआधारीत अँटी शिप सिस्टिमच्या तीन मिसाईल बॅटरींचा पुरवठा करेल. हे घातक अण्वस्त्र २९० किलोमीटर पल्ल्याचे आहे. तसेच ध्वनीच्या वेगापेक्षा त्याचा वेग तीनपट अधिक आहे.

INS SindhuKesari
आता 'हा' देशही पाकिस्तानच्या वाटेवर; 2 पेक्षा जास्त बटाटे, टोमॅटो खरेदीवर बंदी

सिंधुकेसरीच्या या कामगिरीनंतर तैवान, मलेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम या देशांसोबतही या पाणबुडीबाबतच्या कराराचे दरवाजे खुले होणार आहेत. आफ्रिका आणि आखाती देशांशी भारताचा युद्धसराव सुरू असतो.

तर पाणबुडी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रमही भारत आसियान देशांसाठी आयोजित करत असतो. त्यातून या देशांशी संरक्षण सहकार्य वाढवले जात आहे. 20 फेब्रुवारी रोजी फिलिपाइन्सच्या 21 नौसैनिकांनी ब्रह्मोस अँटी-शिप सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे प्रशिक्षण पूर्ण केले.

भारताने फिलिपाइन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकली आहेत. त्यानंतरच भारतीय पाणबुडी इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, चीन दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर आपला दावा करतो. दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) देश - इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई - देखील दक्षिण चीन समुद्राच्या काही भागांवर दावा करतात. यामुळेच आसियान देश आणि चीनमध्ये वाद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com