Collector Kishore Sanyal of Shajapur in Madhya Pradesh had an argument with the truck driver, while attending meeting with truck drivers on protest:
अवजड वाहनचालकांशी संबंधीत असलेल्या 'हिट-अँड-रन' अपघात प्रकरणांवरील नवीन दंडात्मक कायद्यातील तरतुदींविरोधात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला ट्रकचालकांचा संप मंगळवारी संपला.
यावेळी ट्रकचालकांच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या भेटीदरम्यान असे काही घडले, ज्याची सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान ही घटना मध्यप्रदेशातील शाजापूरची असून, संबंधीत जिल्हाधिकाऱ्याचे नाव किशोर कन्याल असे आहे.
ट्रकचालकांशी सुरु असलेल्या बैठकीदरम्यान संतप्त झालेला अधिकारी चालकांना म्हणाला, "तुम्ही काय बोलत आहात त्याचे भान ठेवा. तुम्ही काय कराल; तुमची लायकी काय आहे?" यानंतर ट्रक चालकाने अधिकाऱ्याला उत्तर दिले आणि म्हणाला, “व्यवस्थित बोला.” चालक मागे न हटता अधिकाऱ्याला म्हणाला, “आमची लायकी नाही म्हणून तर आम्ही भांडलोय.”
जिल्हाधिकारी संतप्त होताच बैठक सुरू असलेल्या सभागृहात काही काळ शांतता पसरली. त्यानंतर चालकाने माफीही मागितली.
महामार्गावर वाहनचालकांनी रास्ता रोको केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत बैठकीचे आयोजन करून वाहनचालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
याबाबत जिल्हाधिकारी किशोर कन्याल म्हणाले, एका बैठकीत वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येत होते, दरम्यान एक चालक चुकीचे बोलला, त्यामुळे मला त्याला समजावून सांगावे लागले.
जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांच्या कार्यालयाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ड्रायव्हर्स आणि त्यांच्या संघटनांसोबतच्या आजच्या बैठकीत, जेव्हा एक व्यक्ती 3 जानेवारीनंतर कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्याचे वारंवार बोलत होता तेव्हा जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी त्याला शांत होण्यास सांगितले, यासाठी त्यांनी जरा कडक भाषा वापरली. पण ते कोणाला दुखावण्याच्या उद्देशाने बोलले नव्हते."
'हिट-अँड-रन' प्रकरणांशी संबंधित नवीन कायदा मागे घेण्याची मागणी करत मध्य प्रदेशातील सर्व भागांतील प्रवासी बस व अवजड वाहनचालकांनी काम बंद आंदोलन केले. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत.
सोमवारी आणि मंगळवारी ट्रक, टँकर आणि बसचालकांनीही आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे माल वाहतूक आणि प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होईल, या भीतीने शहरातील पेट्रोल पंपांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.