Goa Petrol-Diesel Price: ट्रक, टँकर चालकांचा संप मागे, गोव्यातील पेट्रोल - डिझेल पुरवठा आणि दराबाबत महत्वाची अपडेट

ट्रक आणि टँकर संप मागे घेतल्यानं देशभरातील मालवाहतूक सुरळीत होणार आहे.
Goa Petrol-Diesel Price 03 January 2024
Goa Petrol-Diesel Price 03 January 2024Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Petrol-Diesel Price: नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर, ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मंगळवारी (दि.02) रात्री मागे घेण्यात आला आहे.

संपामुळे देशातील अनेक शहरांतील पेट्रोल पंपांबाहेर वाहनाच्या रांगा लागल्या तर, काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. गोव्यात संपामुळे इंधन पुरवठा आणि दरात मोठा फरक पडलेला नाही. दरम्यान, संप मागे घेतल्यानं देशभरातील मालवाहतूक सुरळीत होणार आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता ताजे इंधन दर

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Banks Closed for Five Days
Shivaji Maharaj Statue Goa High Court Case
E20 Petrol Problems Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com