CLRI Chennai Chemical Research 2026 Dainik Gomantak
देश

घातक रसायनांचा शोध आता लागणार क्षणार्धात! चेन्नईतील संशोधकांनी विकसित केली अत्यंत वेगवान आणि अचूक तंत्रज्ञान प्रणाली

CLRI Chennai Chemical Research 2026: मानवी मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करणाऱ्या अतिधोकादायक विषारी रासायनिक द्रव्यांचा काही सेकंदांत शोध घेणारी नवी व उपयुक्त तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश आले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मानवी मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करणाऱ्या अतिधोकादायक विषारी रासायनिक द्रव्यांचा काही सेकंदांत शोध घेणारी नवी व उपयुक्त तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. केंद्रीय चर्म संशोधन संस्था, चेन्नई येथील संशोधकांनी केलेल्या या संशोधनामुळे संरक्षण, आपत्कालीन प्रतिसाद, औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रांना मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.

या संशोधनात ‘सेरियम’ या धातूवर आधारित एका विशिष्ट पदार्थाचे नवे गुणधर्म समोर आले आहेत. ‘सी-बीटीबी-मॉल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये कृत्रिम एन्झाइमसारखी कार्यक्षमता असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तो ‘सेंद्रिय फॉस्फेट’ प्रकारातील अतिधोकादायक रासायनिक संयुगांचे जलद विघटन करू शकतो. या गटातील ‘पॅराथिऑन’ आणि ‘पॅराऑक्सॉन’ ही द्रव्ये पूर्वी कीटकनाशक म्हणून वापरली जात होती; मात्र कर्करोग, जन्मदोष आणि मज्जासंस्थेवरील गंभीर परिणामांशी संबंध आढळल्याने अनेक देशांत त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘पॅराऑक्सॉन’ हे ‘पॅराथिऑन’पेक्षा सुमारे ५० पट अधिक विषारी मानले जाते.

प्रणाली कशी काम करते?

१ ही प्रणाली अत्यंत संवेदनशील असून अल्प प्रमाणातील रासायनिक द्रव्यांचाही शोध घेऊ शकते. रंगातील बदल साध्या दूरध्वनी संचाद्वारे मोजता येत असल्याने ही पद्धत स्वस्त, वहनयोग्य आणि प्रत्यक्ष क्षेत्रात वापरण्यास सुलभ ठरते.

2एकसारख्या दिसणाऱ्या इतर रासायनिक पदार्थांपासून विषारी द्रव्य वेगळे ओळखण्याची क्षमता असल्याने तपासणी अधिक विश्वासार्ह बनते.

3 या संशोधनामुळे संरक्षण तयारीला बळ मिळण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातही सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त आली आहे.

वेर्णेकरांनी केले नेतृत्व

साखळी येथील तसेच सध्या चेन्नई येथे कार्यरत डॉ. अमित वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखाली ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिची जलद व स्पष्ट निदान क्षमता. संशोधकांनी तयार केलेल्या कागदी पट्टीवर विषारी द्रव्य आल्यास अवघ्या १३ सेकंदांत रंगबदल सुरू होतो आणि ३५ सेकंदांत तो ठळक नारिंगी-तपकिरी रंगात परिवर्तित होतो. यापूर्वी पिवळसर रंगामुळे निर्माण होणारा गोंधळ या नव्या तंत्रज्ञानामुळे दूर झाला आहे.

या यशाच्या पुढील टप्प्यात आणखी प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू असून, अतिशय सूक्ष्म प्रमाणातील विषारी द्रव्यांचा पाच सेकंदांपेक्षा कमी वेळेत शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे.” -डॉ. अमित वेर्णेकर, संशोधन पथक प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT