India-China Border Dainik Gomantak
देश

India China Conflict: अरुणाचलमध्ये भारत अन् चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अनेक भारतीय जवान जखमी

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमन्तक

India China Clash: अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ नुकतीच ही हाणामारी झाली. भारतीय जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.

दरम्यान, या चकमकीत भारताचे (India) 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. अनेक चिनी सैनिकही जखमी झाले आहेत. कोणाची संख्या जास्त आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या चकमकीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या कमांडर्सनी चीनच्या कमांडरसोबत फ्लॅग मीटिंग केली आहे.

दुसरीकडे, 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर अनेक जण जखमी झाले होते. या चकमकीत चीनचे अनेक सैनिकही मारले गेले होते.

तसेच, अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमधील एलएसी बाजूच्या काही भागात, दोन्ही बाजूकडून त्यांच्या दाव्याच्या मर्यादेपर्यंत गस्त घालतात. 2006 पासून हा ट्रेंड आहे. या भागात गस्त घालताना अनेकदा भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने येतात. अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये अशीच एक घटना घडली होती, जेव्हा काही चीनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी यांगसे येथे काही तासांसाठी ताब्यात घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT