Colonel Wu Qian Dainik Gomantak
देश

India China Border: सीमाविवादावर PM मोदींच्या टिप्पणीनंतर आली चीनी लष्कराची प्रतिक्रिया; म्हणाले, ''सध्या सीमावर्ती भागात...''

India China Border: भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर आता चिनी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे.

Manish Jadhav

India China Border: भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर आता चिनी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी गुरुवारी सांगितले की, चीन आणि भारत यांच्यातील सीमावर्ती भागातील परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे. दोन्ही देशांमध्ये सातत्याने संवाद होत आहे.

वास्तविक, नुकतेच 'न्यूजवीक' या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनमध्ये (China) सुरु असलेल्या सीमावादावर भाष्य केले होते. मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध हे संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. ते पुढे म्हणाले होते की, मला विश्वास आहे की संवादाच्या माध्यमातून दोन्ही देश सीमाविवादावर तोडगा काढतील.

चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या टिप्पण्यांशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान म्हणाले की, "सध्या चीन आणि भारत यांच्यातील सीमावर्ती भागातील परिस्थिती सामान्यतः स्थिर आहे. दोन्ही देशांनी लष्करी माध्यमांद्वारे प्रभावी संवाद साधला आहे. या बाबतीत सकारात्मक प्रगतीही दिसली आहे, जी दोन्ही देशांना मान्य आहे.''

यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनीही पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी माओ निंग म्हणाले होते की, ''चीनने भारतीय पंतप्रधानांच्या टिप्पणीची दखल घेतली आहे. आमचा विश्वास आहे की मजबूत आणि स्थिर चीन-भारत संबंध दोन्ही देशांच्या समान हितांसाठी फायदेशीर आहेत. विशेष म्हणजे, हे शांतता आणि विकासासाठी देखील आवश्यक आहेत.''

माओ निंग पुढे म्हणाले होते की, "आम्हाला आशा आहे की भारत चीनसोबत सकारात्मक दिशेने काम करेल, द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक उंचीवर नेईल, परस्पर विश्वास वाढवेल, संवाद आणि सहकार्याला महत्त्व प्रदान करेल, मतभेदांना योग्यरित्या हाताळेल आणि द्विपक्षीय संबंध विकसित करेल."

भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून लष्करी संघर्ष सुरु आहे

भारत (India) आणि चीन यांच्या सीमेवर 2020 पासून तणाव कायम आहे. 5 मे रोजी पूर्व लडाखमधील पँगॉन्ग लेक परिसरात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. या हिंसक चकमकीत एक भारतीय कर्नल आणि 29 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांच्या संबंधात प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. गतिरोध दूर करण्यासाठी, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत. चिनी लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी आत्तापर्यंत गलवान व्हॅली, पँगॉन्ग लेक, हॉट स्प्रिंग्स आणि जियानान दबान (गोगरा) येथून मागे हटण्यावर सहमती झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT