India-China Border: नव्या चौक्या,नवी बटालियन...चीनच्या कुरघोड्यांविरोधात मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

India-China Border: भारत आणि चीनमध्ये सतत सीमारेषेवरुन वाद होत असल्याचे दिसून येते.
India-China Border
India-China BorderDainik Gomantak

India-China Border: भारत आणि चीनमध्ये सतत सीमारेषेवरुन वाद होत असल्याचे दिसून येते. सीमारेषेवर दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. आता भारत-चीन बॉर्डर मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत.

मोदी सरकारने इंडो- तिबेटिअन बॉर्डर पोलिस फोर्सच्या 7 नवीन बटालिअन तयार करण्याच्या निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर कॅबिनेटने 4.1 किलोमीटर लांबीच्या सिंकुना बोगद्याच्या निर्मितीला परवानगी दिली आहे.

सिंकुना बोगद्याच्या निर्मितीनंतर लदाखमध्ये ऑल कनेक्टिव्हिटी वेदर च्या सुविधा मिळू शकणार आहेत. तसेच सीमाभागात 47 नवीन चौक्या निर्माण करण्यासदेखील कॅबिनेटने परवानगी दिली आहे.

2020 मध्ये पूर्व लदाखमध्ये भारत-चीनमध्ये हिंसक झडप झाली होती त्यावेळी सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानंतर भारत आणि चीनमध्ये सीमारेषेवरुन तणावामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 2022 च्या डिसेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीनचे सैन्य समोर आले होते.

कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने नवीन ऑपरेशनल बेसला परवानगी दिली आहे. याबरोबरच, आयटीबीपीच्या 7 नवीन बटालियनमध्ये 9400 नवीन पदांची भरती करण्यात येईल.आयटीबीपी लदाखच्या काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशच्या जचेपला पर्यत 3488 किलोमीटर सीमारेषेचे संरक्षण करतात.

India-China Border
Pakistan Train Blast: पाकिस्‍तानच्या जाफर एक्‍सप्रेस ट्रेनमध्‍ये मोठा स्‍फोट; 2 प्रवासी ठार तर 4 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार ,आयटीबीपी( ITBP )ची नवीन बटालियन आणि सेक्टर हेडक्वार्टर 2025-26 पर्यंत तयार होईल. दरम्यान, सिंकुला बोगदा नीमू पदम दर्चा रोड लिंकवर निर्माण होईल. सिंकुला बोगद्याच्या निर्मितीनंतर लदाख( Ladakh )च्या बॉर्डरपर्यत ऑल वेदर कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com