Chief Minister Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, 15 ऑगस्टपासून सुरु होणार मोहल्ला क्लिनिक

पंजाबमधील (Punjab) राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. तर दुसरीकडे मान सरकारने जनतेच्या कल्याणार्थ अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यातच आता मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी सांगितले की, आमचे सरकार 15 ऑगस्टपासून राज्यात मोहल्ला क्लिनिक योजना सुरु करणार असून पहिल्या टप्प्यात 75 ठिकाणी दवाखाने सुरु केले जातील. (Chief Minister Bhagwant Mann's big announcement Mohalla Clinic will start from 15th August)

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर, मान म्हणाले की, आम आदमी पार्टी ( Aam Aadmi Party) ने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करेल. टप्प्याटप्प्याने शहरी आणि ग्रामीण भागात मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यात येतील.

दरम्यान, पंजाबमधील मोहल्ला क्लिनीक दिल्लीच्य धर्तीवर चालवले जातील. राज्यभरातील बंद असलेल्या सेवा केंद्रांचे मोहल्ला क्लिनिकमध्ये रुपांतर करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे (Punjab) आरोग्य मंत्री विजय सिंगला यांनी सांगितले होते की, राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी 16,000 मोहल्ला क्लिनिक्सची स्थापना केली जाईल. ते पुढे म्हणाले की, आरोग्य सेवा सुधारणे ही मुख्यमंत्री भगवंत मान यांची सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी 16,000 मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यात येणार आहेत.

मान सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या (Farmers) अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करुन मान यांनी 14 आणि 17 जून रोजी भात पेरणीचा नवा कार्यक्रम जाहीर केला.

शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला होता

यापूर्वी संपूर्ण राज्याचे चार विभागांमध्ये विभाजन करुन भात पेरणी वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी 18, 22, 24 आणि 26 जून या तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या, मात्र शेतकरी संघटनांनी हा कार्यक्रम धुडकावून लावला. एका अधिकृत निवेदनानुसार, मान यांनी शेतकरी नेत्यांना असेही सांगितले की, राज्य सरकारने संपूर्ण मूग पिकाची किमान आधारभूत किंमत 7,275 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT