"पंजाबचं पुनरुज्जीवन होऊ शकतं...: सिद्धू उद्या घेणार मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन तब्बल दोन-अडीच महिने होत आले आहेत.
Navjyot Singh Sidhu
Navjyot Singh Sidhu Dainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होऊन तब्बल दोन-अडीच महिने होत आले आहेत. सरकार स्थापन होताच अमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट सुरु झाल्याचा आरोप विरोधकांनी केलायं. यातच आता काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी आज जाहीर केले की, 'उद्या आपण पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांची राज्याच्या "आर्थिक पुनरुज्जीवना" बाबत चर्चा करणार आहोत.' नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) पक्षाच्या दारुण पराभवानंतर सिध्दूंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले. (Navjyot Singh Sidhu will meet Punjab Chief Minister Bhagwant Mann)

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज ट्विट करत म्हटलंय की, "राज्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या संध्याकाळी 5:15 वाजता चंदिगडमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेणार आहे. पंजाबचे पुनरुज्जीवन केवळ सामूहिक प्रयत्नानेच शक्य आहे."

Navjyot Singh Sidhu
उत्तर प्रदेशात पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये - योगी आदित्यनाथ

विशेष म्हणजे, सिध्दूंनी मुख्यमंत्री मान यांना "प्रामाणिक व्यक्ती" म्हणून संबोधले. पक्षीय राजकारणाच्या वरती उठून राज्यातील माफियांचा बिमोड करण्यासाठी भगवंत मान यांना सिध्दूंनी पाठिंबा देऊ केला आहे.

Navjyot Singh Sidhu
उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद

ट्विटमध्ये त्यांनी पुढे असही म्हटलयं की, "सत्तेत परत येण्यासाठी काँग्रेसला नवा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल... नैतिक अधिकार आणि सचोटीने प्रामाणिक चेहरे समोर आणावे लागतील. आम्ही या महान राज्याच्या अस्तित्वासाठी लढत आहोत... ते एकतर माफिया आहेत किंवा प्रामाणिक लोक आहेत..."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com