IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेला एक व्हायरल व्हिडिओ, ज्यामध्ये साडी परिधान केलेल्या महिला गावात कबड्डी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.
व्हिडिओमध्ये स्त्रिया मोठ्या आवेशाने एकमेकांना आव्हान देत आहेत आणि एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. महिला कबड्डी खेळत असलेल्या या व्हिडिओने 2 लाखांचा आकडा ओलांडून इंटरनेटवर खूप लक्ष वेधून घेतले आहे.
(Chhattisgarh Women Kabaddi Viral Video)
इंटरनेटवरील लोकांनी या खेळात सहभागी होण्यासाठी आणि मोठ्या उत्साहाने खेळल्याबद्दल आणि उत्तम कौशल्य दाखवल्याबद्दलच नव्हे तर एवढा वेगवान खेळ खेळत असतानाही इतक्या सहजतेने साडीत वावरल्याबद्दल महिलांचे कौतुक केले आहे. आधुनिक युगात, स्त्रिया विविध खेळ खेळण्यासाठी खेळ-विशिष्ट पोशाख परिधान करत आहेत, मात्र या महिलांनी पारंपारिक भारतीय पोशाखांमध्ये खेळ खेळत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्त्रिया भारतीय समाजात असलेल्या महान संस्कृतीचे प्रतीक आहेत, असे सर्वजण बोलत आहेत.
व्हिडिओमध्ये, लोक त्याना प्रोत्साहित करताना दिसत आहेत. कबड्डी सामना हा छत्तीसगढिया ऑलिम्पिकचा एक भाग आहे ज्याचे उद्घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्या हस्ते गुरुवार, 6 ऑक्टोबर, 2022 रोजी करण्यात आले.
क्रीडा स्पर्धा 6 ऑक्टोबर ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे. यामध्ये अनेक पारंपारिक खेळ असणार आहेत. छत्तीसगड ऑलिम्पिकमध्ये गिली दांडा, पिटूल, लंगडी, बांटी (कांचा), बिलास, फुगडी आणि गेडी शर्यत यांसारखे खेळ असतील. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र श्रेणीसह सहा वेगवेगळ्या स्तरांमध्ये स्पर्धा खेळल्या जातील. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही या कार्यक्रमांचा भाग होऊ शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.