ED Dainik Gomantak
देश

Mahadev App Case: महादेव ॲप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, दोघांना घेतले ताब्यात; कोर्टाने सुनावली 5 दिवसांची कोठडी

Mahadev App Case: महादेव ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी दोघांना अटक केली आहे.

Manish Jadhav

Mahadev App Case: महादेव ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग ॲप प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी दोघांना अटक केली आहे. नितीन टिबडेवाल आणि अमित अग्रवाल यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पीएमएलए) विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. दोघांनाही 17 जानेवारीपर्यंत ईडी रिमांडवर पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेला अमित अग्रवाल हा रायपूरचा तर नितीन तिब्रेवाल हा कोलकाता येथील रहिवासी आहे.

माहिती देताना ईडीचे वकील सौरभ पांडे यांनी सांगितले की, महादेव ॲप प्रकरणाच्या तपासादरम्यान अमित अग्रवाल आणि नवीन टिबडेवाल यांची नावे समोर आली होती. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पुढे सांगितले की, अटकेनंतर दोघांना शुक्रवारी रायपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. नितीनवर विकास चप्परियाचा सहकारी असल्याचा आरोप आहे, जो स्वतः या प्रकरणात आरोपी आहे. असे सांगितले जात आहे की, नितीनचे टेकप्रो आयटी सोल्युशन्स लि. मध्ये सर्वाधिक शेअर्स होते. ही कंपनी परदेशात गुंतवणुकीच्या नावाखाली महादेव ॲपसाठी काम करत होती.

अमित अग्रवाल हा अनिल अग्रवाल याचा भाऊै

तर अमित अग्रवाल हा महादेव ॲपमधील पार्टनर अनिल अग्रवालचा भाऊ आहे. महादेव ॲपमधून मिळालेल्या पैशाचा वापर त्याने मालमत्ता खरेदीसाठी केला. अमितने ही मालमत्ता स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर खरेदी केली होती. अमितवर त्याचा भाऊ अनिल अग्रवाल याच्याकडून महादेव ॲपच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप आहे आणि या पैशातून त्याने मालमत्ता खरेदी केली. अमित आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यातून अडीच कोटी रुपये काढण्यात आले होते. त्याने बनावट पद्धतीने कर्ज घेतले असल्याचेही दाखवले होते. तपासात आतापर्यंत दोन कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत.

ईडीने दोन्ही आरोपींची चौकशी केली

अटकेनंतर दोन्ही आरोपींची ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक तास चौकशी केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ईडीने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती, जेणेकरुन या प्रकरणातील इतर लोकांची माहिती मिळू शकेल. न्यायालयाने 17 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी मंजूर केली असून त्यानंतर दोन्ही आरोपींना 17 जानेवारीला हजर केले जाणार आहे.

आतापर्यंत 572.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली

महादेव ॲप प्रकरणात ईडीने आतापर्यंत 572.41 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून त्यापैकी 142.86 कोटी रुपयांची चल आणि अचल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने दोन आरोपपत्र दाखल केले असून त्यात सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या नावाचा समावेश आहे. दोघांना दुबईतून ताब्यात घेण्यात आले. या दोघांना भारतात आणण्यासाठी एजन्सी प्रयत्न करत आहे. विशेष न्यायालयाने उप्पलच्या दुबईतून भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

SCROLL FOR NEXT