Mahadev Betting App: मॅच फिक्सिंगमध्ये सहभागाचा आरोप; डाबर ग्रुपच्या अध्यक्ष, संचालकांविरोधात गुन्हा

Dabur Group: मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांची क्रिकेट लीग टीममध्ये इक्विटी स्टेक आहेत. प्लेअर्स बुक वेबसाइट पोर्टल ऑपरेट करण्यासाठी त्याने इतर आरोपींसोबत भागीदारी केली आहे.
Mahadev app
Mahadev appDainik Gomantak
Published on
Updated on

Alleged Involvement in Match Fixing; FIR against Chairman, Director of Dabur Group:

Mahadev Betting App प्रकरणात मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवला आहे.

हे दोघेही डाबर ग्रुपचे चेअरमन आणि डायरेक्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर आठवडाभरापूर्वी ही कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त आज तकने दिले आहे.

नुकतेच केंद्र सरकारने Mahadev Betting App वर बंदी घातली आहे. ज्याची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी ईडीने छत्तीसगडमधून दोन पोलिसांनाही अटक केली आहे.

खरे तर, गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार महादेव बेटिंग अॅपबाबत मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला होता.

या एफआयआरच्या प्रतीमध्ये आरोपी क्रमांक 16 आणि आरोपी क्रमांक 18 हे उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन आहेत. एफआयआरमध्ये एकूण 31 आरोपी आहेत. एफआयआरमध्ये मोहित बर्मन यांच्या पत्त्याचा उल्लेख फोर्ट मुंबई असा होता, जिथे कंपनीच्या रजिस्ट्रारनुसार, त्याच्या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय आहे.

Mahadev app
पाकिस्तानच्या कराची बंदरावर चिनी युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात, सॅटेलाइट इमेज समोर

'डाबर ग्रुपच्या अधिकाऱ्यांची क्रिकेट टीममध्ये इक्विटी स्टेक'

एफआयआरमध्ये तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रोहित कुमार मुरगोई आणि दिनेश खंबाट हे मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्याशी संबंधित आहेत.

एफआयआरमध्ये असेही लिहिले आहे की, मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांची क्रिकेट लीग टीममध्ये इक्विटी स्टेक आहेत. प्लेअर्स बुक वेबसाइट पोर्टल ऑपरेट करण्यासाठी त्याने इतर आरोपींसोबत भागीदारी केली आहे.

मोहित बर्मन, गौरव बर्मन आणि हरेशी कलाभाई आणि त्यांच्या इतर साथीदारांची क्रिकेट लीगमधील मॅच फिक्सिंगमध्ये आरोपींच्या सहभागाबाबत अधिक माहिती आणि पुरावे मिळविण्यासाठी चौकशी करावी, असेही तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.

Mahadev app
Ram Mandir अभिषेक सोहळ्यासाठी विहिंप 10 कोटी कुटुंबांना आमंत्रित करणार

असे पसरले संपूर्ण रॅकेट

प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनुसार, एफआयआरमध्ये आरोपी चंदर अग्रवाल आणि लंडनचे रहिवासी दिनेश खंबाट हे भारतात आयोजित क्रिकेट लीगमधील मॅच फिक्सिंगचे मुख्य सट्टेबाज असल्याचा उल्लेख आहे आणि हे संकेतस्थळ आणि अॅप्सद्वारे देखील केले जाते.

आरोपी अमित शर्मा या दोघांशी जोडले गेले असून, तो त्यांना या प्रक्रियेत मदत करतो. चंदर अग्रवालची लीगमध्ये बॅकडोअर भागीदारी आहे आणि त्याला दुबईचे कनेक्टिंग व्यक्ती हेमंत सूद आणि रोहित कुमार मुरगोई यांनी मदत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com