Mahadev APP ED Raid: महादेव ऑनलाइन सट्टा प्रकरणात ED ची तीन शहरात शोध मोहीम, 417 कोटी रुपये जप्त

महादेव ऑनलाइन बुक अॅप यूएईमधील केंद्रीय मुख्यालयातून चालवले जात होते.
ED Raid Mahadev APP
ED Raid Mahadev APP

ED Raid Mahadev APP: छत्तीसगडमधील महादेव ऑनलाइन सट्टा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने 417 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. केंद्रीय एजन्सीच्या अधिका-यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव अॅपशी जोडलेल्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत ईडीने मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. यात ईडीने 417 कोटी रुपये जप्त केले आहेत.

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी स्थापन केलेली महादेव ऑनलाइन सट्टा कंपनी दुबईतून कार्यरत होती. वेबद्वारे बँक खात्यांतील पैसे काढण्यासाठी ऑनलाइन बुक बेटिंग ऍप्लिकेशनचा वापर करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडीने अलीकडेच कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कचा शोध घेतला. ईडीने कारवाईत अनेक पुरावे आणि 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. महादेव ऑनलाइन बुक अॅप यूएईमधील केंद्रीय मुख्यालयातून चालवले जात होते.

महादेव अॅप हे पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल यांसारख्या विविध लाइव्ह गेम्ससारखा बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे... छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्य पोलिसांनी त्या अॅपवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

महादेव अॅपचे नेटवर्क भारताबाहेर पसरले आहे, असे मानले जाते. नेपाळ, बांगलादेश यासह इतर अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार आहे.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 2 कार, 6 मोबाईल, लॅपटॉप, पासबुक, एटीएम, क्रेडिट कार्ड आणि खाती जप्त केली आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com