Chardham Yatra
Chardham Yatra Dainik Gomantak
देश

Chardham Yatra 2023: IRCTC चे चारधाम यात्रेसाठी खास पॅकेज; मिळतील 'या' सुविधा

Puja Bonkile

IRCTC Tour Packages for Chardham Yatra 2023: IRCTC पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते.

आयआरसीटीसीच्याने पुन्हा एकदा चारधाम यात्रेसाठी खास पॅकेज आणले आहे. जर तुम्हीजर तुम्ही पटना येथून चार धाम यात्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या पॅकेजबद्दल नक्की जाणुन घ्या.

हे टूर पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे. चार धाम यात्रा एक्स पटना असे या टूर पॅकेजचे नाव आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दर्शन घेता येणार आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिलला, बद्रीनाथचे दरवाजे 27 एप्रिलला आणि यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार आहेत.

पॅकेजबद्दल अधिक माहिती

पॅकेजचे नाव - चार धाम यात्रा एक्स पटना

ठिकाण - केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री, गंगोत्री

प्रवास मोड - फ्लाइट

क्साल - कंफर्ट

प्रवासाची सुरुवात - 24 मे

कालावधी - 11 रात्री आणि 12 दिवस

या टूर पॅकेजमध्ये 5 वर्षांखालील मुलांना प्रवास करता येणार नाही. हे टूर पॅकेज 24 मे नंतर पुन्हा 4 जूनपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये पटना ते दिल्ली फ्लाइट असेल आणि दिल्लीहून पटना फ्लाइटने परत येता येईल.

आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल. प्रवाशांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण दिले जाईल.

या टूर पॅकेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

महत्त्वाचे म्हणजे, IRCTC पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी देश-विदेशात प्रवास करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT