Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3: चंद्रयान-3 ची शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण कामगिरी, विक्रम लँडरला मूळ यानापासून विलग करण्यात यश!

Chandrayaan-3 Location: चांद्रयान-3 साठी आजचा दिवस मोठा आहे. विक्रम लँडरला मूळ यानापासून विलग करण्यात इस्रोला यश आले आहे.

Manish Jadhav

Chandrayaan-3 Location: चांद्रयान-3 साठी आजचा दिवस मोठा आहे. विक्रम लँडरला मूळ यानापासून विलग करण्यात इस्रोला यश आले आहे. आता तो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेपर्यंत एकटाच प्रवास करणार आहे.

असे मानले जात आहे की, तो 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. इस्रोचे शास्त्रज्ञ टीव्ही वेंकटेशवन यांच्या मते, लँडरच्या आत एक रोव्हर आहे. आतापर्यंत लँडर विक्रम रोव्हर घेऊन जाणाऱ्या प्रोपल्शन मॉड्यूलने प्रवास करत होता.

दरम्यान, इस्रोच्या या पावलावरुन दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मॉड्युलच्या इंजिनाव्यतिरिक्त इतर गोष्टी व्यवस्थित काम करत आहेत. दुसरे म्हणजे, विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.25 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

इस्रो (ISRO) सध्या जी काही प्रक्रिया अवलंबत आहे, ती चांद्रयान-2 च्या वेळी देखील स्वीकारली गेली होती. त्यानंतरही, प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होऊन, लँडर चंद्रावर उतरण्यासाठी पुढे गेला. पण तो फक्त 2.1 किमी अंतरावर असताना, स्पीड कंट्रोल न झाल्याने क्रॅश लँडिंग झाले होते.

इस्रोने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले आहे की, यात्रेसाठी धन्यवाद...! लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे केले गेले आहे. उद्या, लँडर मॉड्यूल भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता डीबूस्टिंग करुन चंद्राच्या कक्षेत उतरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, चांद्रयान-3 साठी सर्वात महत्वाची वेळ शेवटची 15 मिनिटे असेल. या कालावधीत, चांद्रयान चंद्राच्या 100x100 च्या कक्षेत येईल, तेव्हा लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळा होता.

जेव्हा चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किमी अंतरावर असेल, तेव्हा पुढचा थांबा येईल. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सुरु होईल.

चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर, ते 6, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पुढील कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्या जवळ येत राहिला.

मोहिमेची प्रगती होत असताना, इस्रोने चांद्रयान-3 ची कक्षा हळूहळू कमी करुन चंद्राच्या ध्रुव बिंदूंवर तैनात करण्याची प्रक्रिया पार पाडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT