N Chandrababu Naidu Arrest Dainik Gomantak
देश

Chandrababu Naidu Arrest: चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेनंतर समर्थक आक्रमक; जगनमोहन रेड्डी यांचा पुतळा जाळत...

Chandrababu Naidu Arrest: कार्यकर्त्याची वाढती संख्या लक्षात परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजमुंद्री पोलिसांनी कलम 144 लागू केले होते

दैनिक गोमन्तक

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्याने चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. समर्थकांनी त्यांच्या अटकेला जोरदार विरोध केला आहे.

इतिहास काय सांगतो?

२०१२ मध्ये वाय. एस. रेड्डींनादेखील अटक करण्यात आली होती. ज्या कंपन्यानी जगन मोहन रेड्डींच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे त्यांना वायएसआर शासनाकडून लायसन्स दिले गेले, जमीन दिली, प्रोजेक्ट त्याच कंपन्याना मिळाले आणि त्या कंपन्यांसाठी नियमदेखील शिथिल करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने जगन मोहन रेड्डी यांच्यावर लावला होता. इतकेच नाही तर वाय एस राजशेखर रेड्डी यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केल्याचेदेखील सीबीआयने म्हटले होते.

जगन मोहन रेड्डी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेत काय आहे फरक?

वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावर जेव्हा सीबीआयने आरोप लावत अटक केले होते. तेव्हा ते स्वत: सत्तेत नव्हते. वडिलांच्या सत्तेचा त्यांनी दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

चंद्रबाबू नायडू यांच्यावर कौशल्य विकास निधीतील पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. मात्र दोघांनाही जेव्हा अटक झाल्याची माहीती समोर आली तेव्हा दोघांचेही समर्थक पेटून उठल्याचे दिसत आहे. आंध्रप्रदेश बंदची हाक दोन्ही वेळेस देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, चंद्रबाबू नायडूंच्या अटकेसाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना जबाबदार मानले जात आहे.

सध्या आंध्रप्रदेशमध्ये काय आहे परिस्थिती?

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चंद्रबाबू नायडूंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या तेलुगु देशम पार्टी (टीडीपी)ने विरोध दर्शवत सोमवारी संपूर्ण राज्यात बंदचे आव्हान केले आहे.

टीडीपी आंध्र प्रदेशचे अध्यक्ष अत्चन्नायडू यांनी पार्टीचे सभासद, कार्यकर्त्यांना या आंदोलनात भाग घेण्याचे आवाहन केले आहे. समर्थकांनी शांततेने हे आंदोलन करावे असेदेखील त्यांनी म्हटले आहे. याबरोबरच, त्यांनी सत्ताधारी वाईएसआर पार्टीवर राज्याच्या अन्य विरोधी राजकीय पक्षांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

चंद्राबाबू नायडू यांना २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. त्यांच्या कोठडीपूर्वी कारागृहात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच्या निषेधार्थ टीडीपीचे कार्यकर्ते विजयवाडा न्यायालयाच्या आवारात जमल्याचे पाहायला मिळाले.

कार्यकर्त्याची वाढती संख्या लक्षात परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजमुंद्री पोलिसांनी कलम 144 लागू केले होते. दरम्यान, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा पुतळा जाळल्याचे निदर्शनास आले आहे. आता हे आंदोलन किती व्यापक होणार हे पाहणे महत्वाचे ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT