Bengaluru Bandh: संपामुळे बेंगळुरूमध्ये बंदची हाक! ऑटो-टॅक्सी सेवा बंद, या रस्त्याचा करा वापर

बेंगळुरू आज संपामुळे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
Bengaluru Bandh
Bengaluru BandhDainik Gomantak

Bengaluru Bandh: आज बंगळूरू संपामुळे बंद राहणार आहे. यामध्ये खाजगी बस, कॅब तसेच ७ लाखांहून अधिक वाहन बंद राहणार आहे. वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत  झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच खासगी शाळा आणि व्हॅनचालकांनीही बंदला पाठिंबा दिल्याने अनेक शाळांनी सोमवारी (11 सप्टेंबर) सुट्टी जाहीर केली आहे.

36 खाजगी वाहतूक संघटनांच्या पाठिंब्याने, फेडरेशन ऑफ कर्नाटक स्टेट प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने रविवारी मध्यरात्री ते सोमवार मध्यरात्रीपर्यंत राज्य सरकारने त्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी बंदची हाक दिली आहे. शक्ती योजना, खाजगी बस ऑपरेटरना कर सूट देणे, खाजगी अॅप-आधारित राइड-हेलिंग एग्रीगेटर्स ओला आणि उबेरचे नियमन करणे, रॅपिडो बाइक टॅक्सी आणि इतरांवर बंदी घालणे अशा मागण्या आहेत. फेडरेशनचे नॉमिनेटेड अध्यक्ष नटराज शर्मा यांनी टीएनआयईला सांगितले, “कर्नाटकमधील खाजगी वाहतूक क्षेत्र संकटात आहे आणि शक्ती योजना लागू झाल्यानंतर त्याचा मोठा फटका बसला आहे. या योजनेमुळे आमचा 40 टक्क्यांहून अधिक महसूल बुडाला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी मध्यरात्रीपर्यंत खासगी वाहने बंद राहतील.

सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असे शर्मा म्हणाले. ते म्हणाले की, सरकारने मागण्या मान्य न केल्यास त्यांना राज्यव्यापी बंदची हाक द्यावी लागेल आणि इतर उपाययोजना कराव्या लागतील.

सोमवारी, महासंघाने क्रांतीवीर सांगोली रायण्णा रेल्वे स्टेशनपासून फ्रीडम पार्कपर्यंत मेगा रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. दिवसभर तेथे आंदोलन करणार आहेत. यावेळी वाहनचालकांनी आपली वाहने बाहेर काढू नयेत, असा प्रचार आपल्या समाजात केल्याने बंद यशस्वी होईल, असा विश्वास महासंघाच्या सदस्यांना आहे.

  • वाहतुकीसाठी या रस्त्यांचा करावा वापर

आरआर जंक्शन पासून, कृष्णा फ्लोअर मिलच्या दिशेने, आणि मल्लेश्वरम ते खोडे सर्कलकडे

गुडशेड रोडवरून सांगोली रायण्णा सर्कल मार्गे जीटी रोडकडे, ओकलीपुरम आणि पुढे सुजाता थिएटरकडे

आनंद राव सर्कलपासून जुन्या जेडीएस ऑफिस रोडकडे आणि शेषाद्रिपुरम रोडकडे जा

म्हैसूर बँक सर्कलपासून पॅलेस रोडकडे, महाराणी जंक्शन अंडरपासकडे, बसवेश्वरा सर्कलकडे

  • या रस्त्याने वाहतुक टाळा

केजी रोड

शेषाद्री रोड

जीटी रोड

फ्रीडम पार्क आणि मॅजेस्टिक बस स्टँड जवळील रस्ते

BIAL चे ट्विट

बँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने रविवारी प्रवाशांना बेंगळुरू बंद असल्यामुळे त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास सांगितले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत BIAL ने म्हटले आहे की “11 सप्टेंबर रोजी एकदिवसीय बेंगळुरू बंद आंदोलनामुळे, सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होईल. प्रवाशांनी विमानतळारून जाण्याचे नियोजन करावे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com