India vs New Zealand Dainik Gomantak
देश

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कोणाचा वरचष्मा? पाहा हेड टू हेड आकडेवारी

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना २ मार्च रोजी दुबईच्या मैदानावर खेळवला जाईल.

Sameer Amunekar

India vs New Zealand Head To Head In ODI Record

भारत आणि न्यूझीलंड संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या ग्रुप अ मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे, परंतु दोन्ही संघांचा ग्रुप स्टेजमध्ये अजूनही एक सामना शिल्लक आहे, जो २ मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल.

न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यानंतरच टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध सेमीफायनल सामना खेळेल हे ठरेल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर आहे. सामन्यापूर्वी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांच्या हेड टू हेड रिकॉर्डवर नजर टाकूया.

भारत आणि न्यूझीलंडच्या क्रिकेट संघांमध्ये आतापर्यंत ११८ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने ६० सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंड संघ ५० सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे.

तर ७ सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही. आकडेवारीनुसार, जेव्हा जेव्हा भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत तेव्हा तेव्हा भारताचाच वरचष्मा राहिला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना २०२३ मध्ये झाला होता. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा टीम इंडियाने ७० धावांनी विजय मिळवला होता.

त्या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने शतके झळकावली. गोलंदाजीत, मोहम्मद शमीने चमत्कार केले आणि ८ विकेट्स घेतल्या. शमीला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फक्त एकच सामना खेळला गेला. २५ वर्षांपूर्वी २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये किवी संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT