Goa News: गोव्याच्या कामगार कल्याणकारी योजना UP चे मंत्री अभ्यासणार! कामगारमंत्री राजभर यांचा विशेष दौरा

Anil Rajbhar: राज्य सरकारने आखलेल्या कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर ६ मार्च रोजी गोव्यात येणार आहेत.
Anil Rajbhar Goa Visit
Anil RajbharDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

UP Minister Anil Rajbhar Goa Visit

पणजी: राज्य सरकारने आखलेल्या कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा अभ्यास करण्यासाठी उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर ६ मार्च रोजी गोव्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव डॉ. एम. के. शानमुग सुंदरम यांनी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांना तसे पत्र पाठवले आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे, की कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या वसतिगृह सुविधांबाबत, निवृत्तीवेतन, साधनसामग्री खरेदी अनुदान, अपंगत्व लाभ, शिक्षणासाठी आर्थिक मदत, विवाहासाठी आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत या विषयावर या दौऱ्यात चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री, कामगार मंत्री व कामगार सचिवांशी बैठकीचे आयोजन केले जावे.

उत्तर प्रदेश हे देशातील मोठे राज्य असून, कामगार संख्याही प्रचंड आहे. त्याउलट, गोवा हे छोटे राज्य आहे. दोन्ही राज्यांत कामगार व्यवस्थापनाच्या संदर्भात मोठी तफावत आहे, मात्र तरीही गोव्यातील यशस्वी कामगार धोरणांचा अभ्यास करून ते उत्तर प्रदेशात लागू करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

Anil Rajbhar Goa Visit
Goa Education: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू! मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोव्याचे कामगार कायदे सुव्यवस्थित आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात कृषी, उद्योग, आणि असंघटित क्षेत्रांतील कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यूपी सरकारला विविध धोरणे आखावी लागतात. गोव्यातील श्रम कायद्यांचे पालन, वेतन संरचना, कल्याणकारी योजना यांचा अभ्यास केल्यास यूपीतील कामगार व्यवस्थापन सुधारण्यास मदत होऊ शकते, असे उत्तर प्रदेश सरकारला वाटते.

Anil Rajbhar Goa Visit
TV Cable Providers Goa: थकबाकीपैकी 20 टक्के रक्कम भरा! खंडपीठाचा केबल व्यावसायिकांना दणका; शुल्क भरल्यानंतरच परवाने नूतनीकरण

मार्टिन्स यांचे दिल्लीत प्रभावी सादरीकरण

कामगार आयुक्त डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका परिषदेत गोव्यातील कामगार कल्याण योजनांबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर या दौऱ्याचे नियोजन झाले आहे. या भेटीमुळे दोन्ही राज्यांमधील कामगार धोरणांमध्ये सहकार्य आणि सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील श्रमिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा आणि सुरक्षा उपाय निश्चित करण्याच्या दृष्टीने गोव्याच्या व्यवस्थापन पद्धतींचा उपयोग करता येईल. या दौऱ्यातून अनुभवांची देवाणघेवाण होऊन कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rohan Khaunte BJP Joining Statement
Gen Z Voters India Elections
Goa Casino Director Shooting Case
Former CDS Anil Chauhan reveals Operation Sindoor strategy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com