Uttarakhand Tunnel Accident Dainik Gomantak
देश

Uttarakhand Tunnel Accident: ''बोगद्यात अचानक पाणी आलं अन्..'' उत्तराखंडच्या चमोलीत भीषण अपघात, 7 मजुरांचा मृत्यू; 14 जण जखमी VIDEO

Chamoli Tunnel Tragedy Uttarakhand: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात गुरुवारी (13 ऑगस्ट) एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली.

Manish Jadhav

Chamoli Tunnel Tragedy Uttarakhand: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात गुरुवारी (13 ऑगस्ट) एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. पीपळकोटी येथील टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आणि चिखलाचा ढिगारा शिरल्याने 7 मजुरांचा मृत्यू झाला, तर 14 जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून तातडीने मदत व बचाव कार्य राबवले जात आहे.

दुर्घटना घडली त्या वेळी बोगद्याच्या आत एकूण 22 मजूर काम करत होते. अचानक आलेल्या पाण्याचा आणि मलब्याचा प्रवाह इतका वेगवान होता की मजुरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बचाव पथकांनी तातडीने कारवाई करत बोगद्यात अडकलेल्या 20 मजुरांना बाहेर काढले. दुर्दैवाने त्यापैकी 6 जणांना बाहेर काढताच मृत घोषित करण्यात आले, तर एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 7 वर पोहोचली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये टिहरीचे प्रदीप सिंग पवार, चमोलीचे मुकेश, बिहारचे दुर्लभ शर्मा, झारखंडचे विजय व जितेंद्र कुमार तसेच लोकेश्वर आणि भुनेश्वर यांचा समावेश आहे. लोकेश्वर आणि भुनेश्वर यांच्या मूळ रहिवासी ठिकाणाची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.

या दुर्घटनेतील 14 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये छत्तीसगड, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील कामगारांचा समावेश आहे. जखमींपैकी गोविंद नावाच्या मजुराला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर रोहित पांडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला श्रीनगर येथे रेफर करण्यात आले. उर्वरित सर्व जखमींवर गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या उर्वरित मजुरांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरु आहेत.

या भीषण दुर्घटनेची दखल घेत उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे तात्काळ चमोलीकडे रवाना झाले. ते स्वतः घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आणि मदतकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत. या घटनेमुळे जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT