Uttarakhand Accident: मसुरी-डेहराडून महामार्गावर भीषण अपघात; कार खोल दरीत कोसळल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident On Mussoorie-Dehradun Highway: डेहराडूनमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Uttarakhand Accident
Uttarakhand AccidentDainik Gomantak

Accident On Mussoorie-Dehradun Highway: उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डेहराडूनमध्ये आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डेहराडून-मसुरी रोडवर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. मसुरी-डेहराडून मार्गावरील चुनाखलजवळ कार खोल दरीत कोसळली. कारमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठार झालेल्यांमध्ये चार तरुण आणि दोन मुली आहेत. सध्या पोलीस, अग्निशमन सेवा आणि एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत.

मसुरीला फिरायला गेले होते

दरम्यान, हे सर्वजण राजपूर रोडवर असलेल्या एका कॉलेजमध्ये शिकत होते. सर्व मित्र असल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण मसुरीला फिरायला गेले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी हे लोक मसुरीहून डेहराडूनला परतत असताना चुनाखलजवळ हा अपघात झाला. अचानक त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत कोसळली, त्यामुळे साहही जणांचा मृत्यू झाला. अपघातात (Accident) जखमी झालेल्या एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Uttarakhand Accident
Uttarakhand glacier accident : आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू; तर तब्बल 197 जण अजूनही बेपत्ता    

मृत सर्व कॉलेज विद्यार्थी आहेत

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांनीच पोलिस आणि एसडीआरएफला या प्रकरणाची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अथक परिश्रमानंतर सर्वांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. बचाव पथक पोहोचेपर्यंत कारमधील चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तोपर्यंत दोन मुली श्वास घेत होत्या. मात्र काही वेळाने एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे सिटी कोतवाल अरविंद चौधरी यांनी सांगितले. हे सर्वजण आयएमएस कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्याबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com