Cabinet Decisions Dainik Gomantak
देश

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! उपकरणांच्या उत्पादनाला बळ, दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाला मंजुरी

Delhi Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तसेच आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट (कायमस्वरूपी चुंबक) उत्पादनाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या तसेच आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट (कायमस्वरूपी चुंबक) उत्पादनाची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करण्यात आली. यामुळे विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक व वैद्यकीय उपकरणे, मोटारी यांच्या उत्पादनाचा वेग मंदावला होता. सात हजार २८० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे या उत्पादनाला बळ मिळणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय

कोविड काळादरम्यान चुंबके आणि चिपच्या अभावामुळे मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, संरक्षण, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे आदींचे उत्पादन ठप्प झाले होते. त्याचे महत्त्व जाणून केंद्र सरकारने आधी चिप उत्पादनासाठी सेमीकंडक्टर मिशनची स्थापना केली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात हजार २८० कोटी रुपयांच्या पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली,

अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आजच्या बैठकीत गुजरातमधील देवभूमी द्वारका(ओखा)-कनालुस रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याच्या एक हजार ४५७ कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली.

दुर्मीळ खनिजे येथे आढळतात : महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरातमधील सागरी किनाऱ्यांवर तसेच गुजरात आणि राजस्थानमधील प्राचीन पर्वतांमध्ये.

उपयोग : मोटारी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, संरक्षण, एरोस्पेस, वैद्यकीय उपकरणे आदींमध्ये

उत्पादन क्षमता : वर्षाला सहा हजार टन (प्रत्येकी १२०० टन क्षमतेचे पाच युनिट उभारणार)

देशाची सध्याची आवश्यकता : चार ते पाच हजार टन

योजनेचा कालावधी : सात वर्षे

पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी

पुणे मेट्रो रेल्वेच्या जाळ्यात आणखी ३२ किलोमीटरमीची भर घालणाऱ्या खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग अशा दोन मेट्रो रेल्वे मार्गिकांच्या नऊ हजार ८५८ कोटी रुपयांच्या विस्ताराच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी मिळाली आहे.

पुणे मेट्रोच्या मंजुरी मिळालेल्या दोन मार्गिका

लाईन-४ :

खराडी ते खडकवासला

(लांबी : २५.५ किमी, २२ स्थानके)

लाईन-४ (अ) :

नळ स्टॉप ते माणिकबाग

(लांबी : ६.१ किमी, ६ स्थानके)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

SCROLL FOR NEXT