Patna High Court Verdict Dainik Gomantak
देश

Patna High Court Verdict: पत्नीला 'भूत-पिशाच' म्हणणे क्रूरता नाही; हायकोर्टाने पतीची शिक्षा केली रद्द

Hindu Marriage Act: पाटणा उच्च न्यायालयाने अलीकडेच आपल्या एका निर्णयात म्हटले की, पत्नीला भूत-पिशाच म्हणणारा पती क्रूरतेच्या श्रेणीत येत नाही.

Manish Jadhav

Patna High Court Verdict: पाटणा उच्च न्यायालयाने अलीकडेच आपल्या एका निर्णयात म्हटले की, पत्नीला 'भूत-पिशाच' म्हणणारा पती क्रूरतेच्या श्रेणीत येत नाही. यासोबतच कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरलेल्या पतीची उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करुन मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांच्या एकल खंडपीठाने पती-पत्नीचे भांडण आणि हुंड्यासाठी छळ या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, वैवाहिक संबंधांमध्ये, विशेषत: अयशस्वी वैवाहिक संबंधांमध्ये, पती-पत्नी दोघेही एकमेकांसोबत अश्लाघ्य भाषेचा प्रयोग करतात. ते एकमेकांना शिव्याही देतात. त्यामुळे अशा आरोपांना क्रूरता म्हणता येणार नाही.

याचबरोबर न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांनी आयपीसीच्या कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 4 अंतर्गत कनिष्ठ न्यायालयाने पतीला सुनावलेली शिक्षा रद्द केली. याप्रकरणी नालंदा जिल्हा न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांनी आरोपी पतीला दोषी घोषित केले होते. त्यानंतर नालंदाच्या सीजेएम न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला होता, ज्याला पीडित व्यक्तीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान, या खटल्यातील पत्नीचे आरोपही उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. तिने वडिलांना अनेक पत्रे लिहून पतीकडून होत असलेल्या छळाची तक्रार केली होती. याबाबत न्यायालयाने पुरावे मागितले असता, पत्नीला ते सादर करता आले नाहीत. हुंडा प्रकरणातही पतीने हुंड्यात कार मागितल्याचा महिलेचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अंतर्गत दाखल करण्यात आलेला खटला हा वैयक्तिक कलह, द्वेष आणि दोन पक्षांमधील मतभेदांचा परिणाम आहे. तोही न्यायालयाने फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT