Karnataka High Court Dainik Gomantak
देश

Karnataka High Court: पतीला रंगावरुन बोलणे "क्रूरता", हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Karnataka High Court: काळ्या त्वचेच्या रंगामुळे पतीचा अपमान करणे ही 'क्रूरता' आहे. हे सतत चालू राहिल्यास घटस्फोटासाठी ते एक कारण ठरते.

Manish Jadhav

Karnataka High Court: काळ्या त्वचेच्या रंगामुळे पतीचा अपमान करणे ही 'क्रूरता' आहे. हे सतत चालू राहिल्यास घटस्फोटासाठी ते एक कारण ठरते.

घटस्फोटाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.

एका 44 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 41 वर्षीय पत्नीपासून घटस्फोट देण्याच्या नुकत्याच दिलेल्या निकालात उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

न्यायालयाने सांगितले की, 'उपलब्ध पुराव्यांची बारकाईने तपासणी केल्यावर असा निष्कर्ष निघतो की, पत्नी त्याच्या काळ्या रंगामुळे पतीचा अपमान करत असे आणि त्यामुळेच तिने पतीला सोडले.'

दरम्यान, हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(A) अन्वये घटस्फोटाच्या (Divorce) याचिकेला मंजूरी देताना, उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, "ही बाब लपवण्यासाठी तिने (पत्नीने) पतीवर बेकायदेशीर संबंधांचे खोटे आरोप केले. हे तथ्य नक्कीच क्रूरतेच्या समान आहे.''

बंगळुरुमध्ये (Bangalore) राहणाऱ्या या जोडप्याचे 2007 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. पतीने 2012 मध्ये बंगळुरु येथील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.

त्याचवेळी, पत्नीनेही भारतीय दंड संहितेच्या कलम 498A अंतर्गत पती आणि सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ती आपल्या आई वडिलांबरोबर राहू लागली होती.

'मुलीसाठी वर्षानुवर्षे अपमान सहन केला'

दुसरीकडे, फॅमिली कोर्टात तिने आरोप फेटाळले आणि पती आणि सासरच्या मंडळींवर अत्याचार केल्याचा आरोप केला.

घटस्फोटासाठीचा पतीचा अर्ज फॅमिली कोर्टाने 2017 मध्ये फेटाळला होता, त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने सांगितले की, “पती म्हणतो की पत्नी त्याच्या रंगामुळे त्याचा अपमान करत असे. मुलीच्या हितासाठी हा अपमान सहन करत असल्याचेही पतीने सांगितले.''

पतीला 'काळा' म्हणणे म्हणजे क्रूरता

पतीला 'काळा' म्हणणे म्हणजे क्रूरता आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

फॅमिली कोर्टाचा निर्णय बाजूला ठेवत न्यायालयाने म्हटले की, "पत्नीने पतीकडे परत जाण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि रेकॉर्डवर उपलब्ध पुरावे हे सिद्ध करतात की पतीच्या रंगामुळे तिला लग्नात रस नाही. हे संदर्भ लक्षात घेता फॅमिली कोर्टाने घटस्फोटास मंजूरी द्यावी.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT