Parliament of India Dainik Gomantak
देश

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील आयारामांची लागली लॉट्री ?

नारायन राणे यांना कॅबीनेट (Cabinet) मध्ये स्थान मिळणार आहे, तर इतर मंडळींना राज्यमंत्रीपद दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

आज संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. या अनुशंगाने केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनामा सत्राला सुरुवात झाली आहे. त्यानुसार मंत्रीमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्राच्या नारायन राणे, कपील पाटील, भारती पवार, भागवत कराड या नेत्यांना या मंत्री मंडळांमध्ये स्थान मिळणार असल्याची खात्रीलायक मिळाली आहे. (Four leaders from Maharashtra will get a place in the Union Cabinet)

विशेष म्हणजे यामध्ये इतर पक्षातुन आलेल्या नेत्यांना या मंत्रालयात स्थान देण्यात आले असल्याचे दिसते आहे. यापैकी नारायन राणे यांना कॅबीनेट मध्ये स्थान मिळणार आहे, तर इतर मंडळींना राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची शक्यता आहे. एकुणच कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे तर ठाण्यातील कपील पाटील यांना भाजपने मंत्रीपद देत असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नारायन राणे कॉंग्रेस मधून तर कपील पाटील हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले आहेत.

दरम्यान, काही वेळापुर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, सदानंद गौडा, संतोष गंगवाल यांनी देखील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बाबुल सुप्रीयो, डी.व्ही सदानंद गौडा, संजय धोत्रे हे देखील राजीनामा दिल्याची चर्चा सुरु आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT