Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: शिंगाला शिंग भिडलं अन् उडाला थरार! भररस्त्यात सांडांची थरकाप उडवणारी झुंज; युजर म्हणाले, ''हा नक्कीच गर्लफ्रेंडचा मॅटर दिसतोय''

Viral Video Two Bulls Fighting: सध्या असाच एक दोन सांडांच्या झुंजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याखालील कमेंट्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Manish Jadhav

Viral Bulls Fight Video : सध्याच्या डिजिटल युगात देशाच्या काना कोपऱ्यात काहीही अजब किंवा वेगळे घडले की, लगेच कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवतो आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचवला जातो. जर तो व्हिडिओ खरोखरच अनोखा असेल, तर नेटकरी त्याला डोक्यावर घेतात आणि पाहता पाहता तो व्हायरल होतो. जर तुम्ही दररोज सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्हाला अशा अनेक विचित्र आणि मनोरंजक व्हिडिओंची सवय झाली असेल. असाच एक दोन सांडांच्या झुंजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याखालील कमेंट्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन सांड एकमेकांशी भिडलेले दिसत आहेत. एखाद्या जुन्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे हे दोन्ही प्राणी एकमेकांवर तुटून पडले असून त्यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु आहे. 55 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये कधी काळा सांड पांढऱ्या सांडावर भारी पडताना दिसतो, तर कधी पांढरा सांड पूर्ण ताकदीनिशी काळ्या सांडाला मागे रेटतो. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही लढत विनाथांबा सुरुच राहते. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनेही कदाचित हे युद्ध कधी संपेल याचा अंदाज नसल्याने चित्रीकरण थांबवले असावे असे वाटते. मात्र, जितका भाग रेकॉर्ड झाला तो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

हा व्हिडिओ @arayaawww नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. मात्र, व्हिडिओपेक्षा अधिक चर्चा होत आहे ती याला दिलेल्या कॅप्शनची. पोस्टमध्ये मजेशीरपणे लिहिले की, "ही पुरुष जात कुठेही शांततेत राहूच शकत नाही." या एका ओळीमुळे कमेंट सेक्शनमध्ये जणू स्त्री-पुरुष वादाची दुसरी एक 'डिजिटल' झुंज सुरु झाली आहे. एका यूजरने चक्क असा दावा केला की, "हे नक्कीच एखाद्या गाईवरुन म्हणजेच 'मुलीच्या मॅटर'वरुन लढत असावेत."

तर दुसऱ्याने प्रतिवाद करत लिहिले की, "भांडणे नेहमी स्त्री जातीमुळेच सुरु होतात, हे नक्कीच गर्लफ्रेंडचे प्रकरण असावे." काही युजर्संनी तर या झुंजीला आधुनिक फिटनेसची जोड देत, "यांना नवीनच जिमचे वेड चढलेले दिसतेय," अशी उपरोधिक टिप्पणी केली. अशा प्रकारे, सांडांच्या या मैदानी लढाईने आता सोशल मीडियावर (Social Media) मिश्किल वादाचे रुप धारण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT