Amritsar Dainik Gomantak
देश

Pakistani Drone: बीएसएफ जवानांची मोठी कारवाई, अमृतसरमध्ये पुन्हा हाणून पाडला पाकिस्तानी ड्रोन; 3.2 किलो हेरॉइन जप्त

पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Puja Bonkile

Amritsar: अमृतसरमधील अटारी येथे भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला बीएसएफच्या जवानांनी अडवून पाडले आहे. ड्रोनद्वारे 3.2 किलो हेरॉईन जप्त करण्यात आली आहे.

अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत फाजिल्का पोलिसांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रग तस्करांचे ध्येय अयशस्वी केले आहे. 9.387 किलो हेरॉईनची खेप जप्त केली आहे. याप्रकरणी हेरॉईनची खेप घेऊन जाणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार होतोय घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. महिन्याभरात जवनांनी पाच  ड्रोन पाडले आहेत.  

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसर, भारताच्या हवाई हद्दीत आलेले एक ड्रोन  पाडण्यात आले आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. 3.2 किलो  हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

  • ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न

अंमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन हाणून पाडले आहेत.

त्यातील काही ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता पुन्हा ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न होत आहेत. हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

राजस्थान, गुजरात, पंजाब,  येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असून लष्करांनी ते हाणून पाडले आहेत.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

SCROLL FOR NEXT