Robbery Fail Video: सोशल मीडिया हे सध्या व्हायरल कंटेंटचे एक चालते-फिरते केंद्र बनले आहे. आपण जितक्या वेळा फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा 'X' राहतो, तितक्या वेळा आपल्याला काहीतरी वेगळे आणि अनोखे पाहायला मिळते. दररोज लाखो व्हिडिओ पोस्ट होतात, जे आपल्या आवडीनुसार आपल्या फीडवर येत राहतात. मात्र, काही व्हिडिओ असे असतात जे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आणि इंटरनेटवर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. सध्या असाच एक चित्तथरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लुटारुंची हिंमत एका सामान्य माणसाने कशी मोडून काढली, हे पाहायला मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, तीन बदमाश हातात बंदुका घेऊन एका दुकानावर धाड टाकतात. त्यांनी दुकानातील पैसे किंवा काही मौल्यवान सामान लुटले असल्याचे दृश्यावरुन समजते. चोरी केल्यानंतर ते पळून जाण्याच्या तयारीत असतात. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ते हवेत बंदुका दाखवतात, जेणेकरुन कोणीही त्यांच्या जवळ येण्याची हिंमत करणार नाही. पळून जाण्यासाठी ते एकाच दुचाकीवर बसतात. पहिला बसतो, पाठोपाठ दुसरा आणि मग तिसराही बाईकवर स्वार होतो. त्यांना वाटले होते की, आता आपण सुरक्षितपणे पसार होऊ, पण तेवढ्यात एका व्यक्तीने असे काही केले की संपूर्ण खेळच पालटला.
तिन्ही लुटारु बाईकवर बसून निघणारच, तितक्यात पाठीमागून एक व्यक्ती वेगाने धावत येते आणि थेट त्या बाईकवर असलेल्या लुटारुंवर हल्ला चढवते. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की लुटारुंना सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्या एका व्यक्तीला पाहून आजूबाजूला उभे असलेले इतर नागरिकही धावून येतात आणि क्षणात तिन्ही लुटारुंना खाली पाडून घेरतात. त्यानंतर लोक त्यांना असं काही 'धुतात की बंदुकीचा धाक दाखवणारा तो बदमाश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडू लागतो. व्हिडिओच्या पुढील भागात काय झाले हे दिसत नसले तरी, त्या लुटारुंची चांगलीच धुलाई झाली असणार यात शंका नाही.
हा व्हिडिओ 'X' प्लॅटफॉर्मवर @Just_Raghvi नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये 'गलत जगह पंगा ले लिया' (चुकीच्या ठिकाणी नडलो) असे लिहिले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, "आता हे वाचणार नाहीत." दुसऱ्या एकाने लिहिले, "गुरु, आता पकडले गेले!" तिसऱ्या युजरने "यांच्यासोबत असंच व्हायला हवं होतं" अशी प्रतिक्रिया दिली, तर चौथ्या युजरने "आता गेले हे कामातून" असे म्हणत लुटारुंची फिरकी घेतली. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, पण शौर्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर (Internet) धुमाकूळ घालत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.