MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

MS Dhoni Cigarette Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
MS Dhoni Cigarette Viral Video
MS Dhoni Cigarette Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. धोनीची गणना जगातील सर्वात यशस्वी आणि शिस्तप्रिय खेळाडूंमध्ये केली जाते, मात्र एका व्हायरल व्हिडिओने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. नुकताच तो बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला आपल्या पत्नीसह उपस्थित राहिला होता. या दरम्यान धोनीच्या कारमधील एका दृश्याने इंटरनेटवर वादाला तोंड फोडले आहे.

व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर वेगाने पसरत असलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी कारच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. कारमध्ये त्यांची पत्नी साक्षी आणि आणखी एक व्यक्ती मागच्या सीटवर बसली होती. धोनी जेव्हा पार्टीसाठी पोहोचला, तेव्हा पापाराझी आणि चाहत्यांनी त्यांच्या कारला घेराव घातला होता.

यावेळी एका कॅमेरामॅनने कारच्या आतील भागावर झूम केले असता, मागच्या बाजूला सिगरेटची एक डबी ठेवलेली स्पष्टपणे दिसून आली. हे दृश्य समोर येताच नेटकऱ्यांनी धोनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही डबी नेमकी कोणाची होती धोनीची, त्याच्या पत्नीची की कारमधील तिसऱ्या व्यक्तीची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

MS Dhoni Cigarette Viral Video
Goa Education: 11 वीच्‍या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! उच्च माध्‍यमिक विद्यालये बनवणार प्रश्नपत्रिका; प्रश्‍‍नांची बँक येणार वापरात

हुक्का प्रकरण

धोनीच्या बाबतीत व्यसनांशी संबंधित वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका कार्यक्रमात हुक्का पिताना दिसत होता. त्यावेळीही चाहत्यांमध्ये दोन गट पडले होते; काहींनी हा त्याच्या खासगी आयुष्याचा भाग असल्याचे म्हटले, तर काहींनी कोट्यवधी तरुणांचा आदर्श असलेल्या खेळाडूने असे करणे चुकीचे असल्याचे मत मांडले होते.

तसेच, माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचा एक जुना व्हिडिओही अलीकडेच चर्चेत आला होता, ज्याचा संदर्भ धोनीशी जोडला गेला होता, मात्र इरफानने नंतर त्याचे स्पष्टीकरण दिले होते.

MS Dhoni Cigarette Viral Video
Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

धोनीला मानणारा एक मोठा वर्ग आजही त्याला निर्दोष मानत आहे. अनेक चाहत्यांच्या मते, धोनी स्वतः फिटनेसचा अत्यंत शौकीन आहे आणि ती सिगरेटची डबी त्याच्या गाडीत बसलेल्या इतर कोणाची तरी असू शकते. तर दुसरीकडे, टीकाकारांचे म्हणणे आहे की सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या सेलिब्रिटींनी अशा गोष्टींपासून लांब राहणे आवश्यक आहे. सलमान खानच्या पार्टीतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार ट्रेंड होत असून, धोनी यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com