Crime
Crime Dainik Gomantak
देश

Kolkata Murder Case: श्रद्धासारखेच हत्या प्रकरण, आईच्या सांगण्यावरुन मुलाने केले वडिलांचे 6 तुकडे

दैनिक गोमन्तक

Kolkata Father Killing: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका मुलाने आईच्या सांगण्यावरुन वडिलांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने वडिलांच्या मृतदेहाचे 6 तुकडे केले. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा मर्डर केसपासून प्रेरित होऊन आई-मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने बाथरुममध्ये करवतीच्या सहाय्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले, ज्यामध्ये आईनेही त्याला साथ दिली. आई आणि मुलगा आधी मृतदेहाचे तुकडे सायकलवर एकत्र फेकण्यासाठी गेले. मात्र, नंतर दोन वेळा मुलगा एकटाच मृतदेहाचे तुकडे फेकून देण्यासाठी गेला.

आई आणि मुलाने मिळून वडिलांची हत्या केली

ही हृदयद्रावक घटना कोलकात्यातील (Kolkata) बरुईपूर भागात घडली आहे. आई-मुलाच्या जोडीने उज्ज्वल चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीची हत्या केली आणि नंतर दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने प्रेरित होऊन त्याचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. खरे तर खुनाच्या 3-4 तासांनंतरही आई-मुलाला काय करावे हे समजत नसताना दिल्लीतील (Delhi) श्रद्धा खून प्रकरणासारखेच काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि मुलाने वडिलांचे 6 तुकडे केले.

कोलकात्यात श्रद्धासारखी हत्या प्रकरण

दिल्लीतील छतरपूर येथील श्रद्धा हत्याकांड तब्बल 5 महिन्यांनंतर उघडकीस आले आहे. 18 मे 2022 रोजी, लिव्ह-इन पार्टनर आफताबने कथितरित्या श्रद्धाचे 35 तुकडे केले. आफताबने मृतदेहाचे तुकडे सुमारे 3 आठवडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते, असा आरोप आहे. यासाठी त्याने नवीन फ्रीज विकत घेतला. मात्र, नंतर त्याने मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. त्याचा शोध सुरुच आहे. यातच कोलकाता येथेही अशीच एक घटना घडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News : अवाजवी शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्‍था निशाण्यावर; मुख्‍यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Panaji News : दहावी झाली, आता पुढे काय? स्मार्ट निर्णय घ्या; व्यावसायिक, औद्योगिक संस्थांचे पर्याय

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

SCROLL FOR NEXT