रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट (Railway Bonus 2021) देत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनसबाबतचा निर्णय घेण्यात आला Dainik Gomantak
देश

Railway Bonus 2021: सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसचे 'सुपर फास्ट' गिफ्ट

मंत्रिमंडळाने 78 दिवसांचा बोनस मंजूर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना (railway employees) दसऱ्यापूर्वी बोनस दिला जाईल. कर्मचाऱ्यांना दरवर्षी 78 दिवसांचा पगार बोनस (Bonus) दिला जातो. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन- ग्रँटेड कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.

दैनिक गोमन्तक

रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट (Railway Bonus 2021) देत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनसबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाकूर म्हणाले, मंत्रिमंडळाने 78 दिवसांचा बोनस मंजूर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी बोनस दिला जाईल. कर्मचाऱ्यांना दरवर्षी 78 दिवसांचा पगार बोनस दिला जातो. रेल्वेच्या सुमारे 11.56 लाख नॉन- ग्रँटेड कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 18000 रुपये मिळू शकतात. बोनस सामान्यतः 72 दिवसांचा असतो. पण सरकार 78 दिवसांचा बोनस देत आहे. 11.56 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून, यासाठी एकूण 1985 कोटी रुपये खर्च केले जातील.

कोणत्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील

रेल्वेच्या उत्पादकतेवर आधारित बोनस सर्व ग्रॅंट नसलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचारी वगळता) समावेश करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गा पूजा/दसऱ्यापूर्वी PLB मिळते. जे कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत सेवेत आहेत आणि त्यांना आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान निलंबित किंवा सोडले गेले नाही किंवा निवृत्त केले गेले नाही. त्यांना बोनस दिला जाईल.

तुम्हाला कोणत्या आधारावर पैसे मिळतात?

सरकार इतर कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (NPLB) देते. त्याची कमाल मर्यादा दरमहा 1200 रुपयांच्या आधारावर आहे. त्याचे सूत्र (1200X40/30.4 = 1184.21) वर केली जाते. जर भत्ता दरमहा 1200 रुपयांपेक्षा कमी असेल तर बोनसची गणना मासिक आधारावर केली जाईल. आदेशानुसार, पीएलबीचा खर्च रेल्वे विभाग उचलणार आहे.

याशिवाय कोल इंडिया लि. (कोल इंडिया लिमिटेड) ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी त्याच्या सर्व नॉन-एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति कर्मचारी, 2500 चे परफॉर्मन्स-लिंक्ड बक्षीस जाहीर केले आहे. महारत्न कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की 11 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वीच्या कामगिरीवर आधारित PLR दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT