नवरात्रीच्या मुहूर्तावर भारतीय रेल्वे कडून गोव्याला गिफ्ट

जसीडिह-वास्को-द-गामा एक्सप्रेस आजपासून जसीडिह आणि वास्को द गामा दरम्यान धावणार
Direct Train to Goa: Jasidih-Vasco-da-Gama Express
Direct Train to Goa: Jasidih-Vasco-da-Gama Express Dainik Gomantak
Published on
Updated on

झारखंड (Jharkhand) ते गोवा (Goa) प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) झारखंडमधील प्रवाशांना दुर्गा पूजेची (Navratri Utsav) भेट दिली आहे. बाबा नागरी देवघर ते गोवा प्रस्तावित ट्रेन चालवण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही ट्रेन कालपासून सप्टेंबरपासून जसीडिह आणि वास्को द गामा(Vasco-da-Gama) सुरू झाली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर गोड्डाचे खासदार डॉ.निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी रांचीचे खासदार संजय सेठ, राज्यसभा खासदार महेश पोद्दार, खासदार दीपक प्रकाश, भाजपचे आमदार बाबुलाल मरंदाई आणि सीपी सिंह रेल्वेच्या स्वागतासाठी रांची रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते.

गोव्याबरोबर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशला मिळाली नवीन ट्रेन

जसीडिह-वास्को द गामा साप्ताहिक ट्रेन चालवल्याने केवळ झारखंड ते गोवा ही थेट ट्रेनच नाही तर झारखंड ते छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशसाठी आणखी एक ट्रेनही उपलब्ध करण्यात येणार आहे. या ट्रेनने तुम्ही सिकंदराबादलाही जाऊ शकता. ही ट्रेन दुर्गापूजेच्या अगदी आधी सुटणार आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात गोव्याला जाणाऱ्या लोकांसाठी ही थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे.

Direct Train to Goa: Jasidih-Vasco-da-Gama Express
शेतकऱ्यांसाठी 12 डिजिटचा Unique ID; केंद्र सरकारचा प्लॅन?

आतापर्यंत झारखंड आणि गोव्याला जाणारे प्रवासी पश्चिम बंगाल च्या ट्रेनवर अवलंबून होते. हावडाहून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये, किंवा धनबादहून मुंबईला जाण्यासाठी, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी किंवा इतर पर्यायांचा शोध प्रवाशांना घ्यावा लागत होता. मात्र आता प्रवाशांची त्रास कमी होणार आहे. आता झारखंड ते गोवा अशी थेट ट्रेन धावणार आहे.

या स्थानकांवर घेणार थांबा

जसीडिह, मधुपूर, चित्तरंजन, बाराकर, धनबाद, कात्रसगढ, चंद्रपुरा, बोकारो, मुरी, रांची, हटिया, राउरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, बल्लारशाह, मंचिरियाल, काझीपेट, सिकंदराबाद, विकराबाद, रायचूर, रायचूर , तोरणागुल्लू, हसपेट, कोप्पल, गडग, ​​हुबळी, धारवाड, लोंडा, कॅसल रॉक, कूलम, मार्गो, माजोर्डा आणि सनवोर्डेम या ठिकाणी ही ट्रेन थांबणार आहे.

Direct Train to Goa: Jasidih-Vasco-da-Gama Express
Monsoon Update:मुंबईत जोरदार पाऊस तर देशभरात वरुण राजा लावणार हजेरी

वेळापत्रक

  • जसीडिह-वास्को-द-गामा एक्सप्रेस

  1. जसीडीह - दुपारी 1:10

  2. धनबाद - दुपारी 4:15

  3. बोकारो - संध्याकाळी 6:20 वास्को -द -गामा - दुपारी 2:30

  • वास्को-द-गामा-जसीडिह एक्सप्रेस

  1. वास्को -द -गामा - पहाटे5:15 बोकारो - दुपारी 1:40

  2. धनबाद - सकाळी 3:45 जसीडिह - सकाळी 7:00

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com