Tejasvi Surya Dainik Gomantak
देश

''काँग्रेस म्हणजे 'आधुनिक मुस्लिम लीग', तर गेहलोत...''

विशेष म्हणजे कॉंग्रेस (Congress) हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे आणि अत्याचार करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मुघल शासक औरंगजेबशी तुलना करुन, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला "आधुनिक मुस्लिम लीग" म्हटले आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस (Congress) हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे आणि अत्याचार करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या तुष्टीकरण धोरणाविरोधात बीजेवायएम शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे देखील ते म्हणाले. तेजस्वी सूर्या आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया यांच्या नेतृत्वाखाली करौलीला जाणाऱ्या भाजप (BJP) कार्यकर्त्यांना बुधवारी करौली-दौसा सीमेवर पोलिसांनी अडवले. हे लोक 2 एप्रिल रोजी करौली शहरात नवसंवत्सरच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीत दगडफेक झाल्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी जात होते.

तसेच, मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले की, राजस्थानमधील (Rajasthan) जनतेच्या सामंजस्यामुळे भाजपला त्रास होत आहे. जर कोणी राजस्थानची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यानंतर दौसाजवळील दुबीमध्ये पत्रकारांशी बोलताना सूर्या म्हणाले, "तुष्टीकरणाच्या या धोरणाविरोधात युवा मोर्चा शेवटपर्यंत लढेल."

ते पुढे म्हणाले की, 'काँग्रेस पक्षाच्या हिंदुविरोधी, मानवताविरोधी आणि भारतविरोधी धोरणाचा मी निषेध करतो... आजचा काँग्रेस पक्ष हा आधुनिक मुस्लिम लीग आहे.' ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्यापूर्वी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम, हिंदूंवर अत्याचाराचे जे काम मुस्लिम लीग करत होती, ते आज राहुल गांधी, सोनिया गांधी (Sonia Gandhi), अशोक गेहलोत यांचा काँग्रेस पक्ष आधुनिक मुस्लिम लीगप्रमाणे करत आहे.''

“हे राजस्थान आहे, अफगाणिस्तान नाही. राज्य सरकारने हिंदूंना देण्यात येत असणारी दुय्यम त्वरित थांबवावी. राज्यातील हिंदुत्वविरोधी, भारतविरोधी धोरणाचा मी निषेध करतो.. मंदिर होते. मात्र औरंगजेब आणि त्याच्या वंशजांनी त्याच्यावर हल्ला केला होता, त्यानंतर हिंदू लोकांनी मथुरा वृंदावनातून मदन मोहन मंदिरातील मूर्ती आणून करौलीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती.''

ते पुढे म्हणाले, "करौली हे हिंदूंसाठी पवित्र ठिकाण आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असणारी हिंदू मंदिरे जतन केली जाऊ शकतात. आजही करौलीच्या मदन मोहन मंदिराचा इतिहास आहे.''

ते पुढे म्हणाले, "राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून इथे जंगलराज अवतरले आहे." पुनिया यांनी अशोक गेहलोत सरकारला घेरताना म्हटले की, 'आज काँग्रेस सरकारचा तुष्टीकरणाचा चेहरा समोर आला आहे.'

गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, ''ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत, तिथे रामनवमीच्या दिवशी दंगली उसळल्या. दुसरीकडे मात्र राजस्थानमध्ये सर्व समुदायांनी मिळून रामनवमीचा सण साजरा केला. इथे हिंदू, मुस्लिम, शीख यांच्यासह सर्व धर्म, वर्गाच्या लोकांनी रामनवमीच्या मिरवणुकांचे स्वागत केले. राजस्थानमधील लोकांच्या एकजुटीने आणि सौहार्दपूर्ण वातावरणामुळे भाजप त्रस्त आहे. राज्यात रामनवमीचा सण शांततेत कसा साजरा झाला, याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे.''

गेहलोत पुढे म्हणाले, "राज्यात जातीय वातावरण कसे निर्माण करता येईल, यासाठी भाजप नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कधी ते करौलीमध्ये जाऊन दिशाभूल करतात, तर कधी राज्यपालांना निवेदन देतात जेणेकरुन तणाव कसा कायम राहील याचा प्रयत्न करतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य सरकारने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.''

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, "कोणत्याही व्यक्तीने राजस्थानची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, मग तो कोणत्याही पक्षाचा किंवा वर्गाचा असो. " करौलीमध्ये जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी करौली-दौसा सीमेवर पोलिसांनी अडवले. दौसाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी राम खिलाडी मीना यांनी सांगितले की, सूर्या आणि पूनी यांना करौलीला जाण्यापासून रोखले, त्यावर त्यांनी त्यांना अटक केली. मीना यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नंतर बसमध्ये बसवून घेऊन गेले. भाजपचे हे नेते आणि कार्यकर्ते 'न्याय रॅली'अंतर्गत करौलीतील आग आणि हिंसाचारात पीडितांना भेटण्यासाठी जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT