योगी आदित्यनाथांचे कार्य प्रमोद सावंतांना गोव्याच्या विकासासाठी प्रेरणा देते

मोदी नाही तर योगी आदित्यनाथ देतात प्रमोद सावंतांना गोव्यात काम करण्याची प्रेरणा
Yogi Adityanath work style inspires Goa CM Pramod Sawant
Yogi Adityanath work style inspires Goa CM Pramod SawantDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) विजय मिळवून पुन्हा सत्तेत येण्याची वाट पाहत आहेत. अशातच गोव्यात सावंत यांच्या प्रचारालाही वेग आला आहे. मात्र सावंत (Pramod Sawant) यांचे प्रेरणास्थान कोण असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना "प्रेरणादायी" व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले. "योगी आदित्यनाथ यांची कार्यपद्धती आणि कार्यशैली मला प्रेरणा देते. ते ज्या पद्धतीने आपले काम पूर्ण करतात, ज्या शैलीत ते काम करत आहे ती खूप प्रेरणादायी आहे, असे प्रमोद सावंत यांनी इंडिया टुडेच्या राऊंडटेबल गोवा कार्यक्रमात बोलताना सांगितले.

गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी सर्व 40 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल असा दावा सावंत यांनी केला आहे. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत, भाजपने काँग्रेसला पिछाडीवर ठेवून सरकार स्थापन करण्यात यश मिळविले. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी युती केली. नंतर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची (BJP) बाजू आता मजबूत झाली.

Yogi Adityanath work style inspires Goa CM Pramod Sawant
Goa Election: राहुल गांधी गोव्यात दाखल; घरोघरी प्रचारात सहभागी

गोव्यात डबल इंजिनाचे सरकार

“भाजपला कोणत्याही पक्षाच्या किंवा आमदाराच्या पाठिंब्याची गरज असेल असे मला वाटत नाही. आम्ही स्वबळावर गोव्यात सरकार स्थापन करू. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात डबल इंजिनाचे सरकार आणण्यास तयार आहेत. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना देवाची शपथ घ्यायला लावली आहे की ते पक्ष बदलणार नाहीत. आम्ही असे काही केले नाही कारण आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे असे सावंत म्हणाले.

“मला विश्वास आहे की भाजप सत्तेवर येईल. काँग्रेस उमेदवार उभे करत आहे, पण त्यांचा त्याच्याच नेत्यांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी शपथा आना घेणं सुरू आहे. आम्ही आमदार खरेदी करत नाही, पण जे आमच्याकडे आलेत ते गोव्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आले," असे म्हणत सावंत यांनी कॉंग्रेसवर (Congress) खोचक टिका केली आहे.

पर्रीकर पुत्राला मोठा नेता व्हायचे होते तर...

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून गोव्याची निवडणूक लढवणाऱ्या भाजपविरोधात पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केली आहे. मात्र प्रमोद सावंत यांनी उत्पल पर्रीकरांच्या गोव्यात मोठा नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “आम्ही त्यांना निवडणूक लढवण्यासाठी चार जागा देऊ केल्या. त्यांच्यासारख्या पक्षाच्या नेत्यासाठी त्यांनी एक जागा स्वीकारायला हवी होती. भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारा तो मोठा नेता होऊ शकला असता. पण त्यांनी ते तिकिट नाकारले. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलले. आणि जर कोणाला खरच मोठा नेता व्हायचे असेल, आमदार व्हायचे असेल, किंवा राजकारणात यायाचे असेल तर त्यांनी देऊ केलेली एक जागा स्वीकारायला हवी होती.”

Yogi Adityanath work style inspires Goa CM Pramod Sawant
Goa Election: भाजपचे राष्ट्रीय नेते 6 ते 11 फेब्रुवारी रोजी गोवा दौऱ्यावर

भाजप जिंकत असेल तर दुसऱ्या क्रमांकावर कोण?

गोव्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेणाऱ्या तृणमूल काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने (आप) गोव्याची निवडणूक बहुकोणीय लढत बनवली आहे. यावर प्रमोद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “गोवा निवडणुकीत नंबर दोन कोण आहे हे मी सांगू शकत नाही. पण या सर्वांना भाजपचा पराभव करायचा आहे, असे म्हणायला हरकत नाही. भाजपला सत्तेत आणण्याचे आमचे ध्येय आहे. भाजपला सत्तेत आणून गोव्याचा विकास करायचा आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांशी वेगवेगळ्या जागांवर लढत आहोत. नंबर दोन कोण हे मी आता सांगू शकत नाही,” असे सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com