Ravi Shankar Prasad Dainik Gomantak
देश

सनातन धर्माचा विरोध करुन व्होट बँकेचे राजकारण करण्याचा विरोधकांचा छुपा अजेंडा- रविशंकर प्रसाद

Sanatan Dharma Row: देशात मागील दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे.

Manish Jadhav

Sanatan Dharma Row: देशात मागील दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच आता, प्राचीन श्रद्धा परंपरांबद्दल द्रमुकच्या नेत्यांकडून वारंवार टीकाटिप्पणी होत असताना विरोधी पक्षनेत्यांच्या "मौन" वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने मंगळवारी सनातन धर्मावर व्होट बँकेच्या राजकारणासाठी हल्ला करण्याचा इंडिया युतीचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला.

दरम्यान, या मुद्द्यावरुन भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

काँग्रेस (Congress) नेतृत्वावर निशाणा साधताना प्रसाद म्हणाले की, 'सोनिया गांधी या प्रकरणावर जितक्या काळ मौन बाळगतील तितके हे स्पष्ट होईल की, सनातन धर्माला विरोध करणे हा इंडिया युतीचा छुपा अजेंडा आहे.'

सनातन धर्माला विरोध करणे हा या युतीचा अजेंडा असल्याच्या द्रमुक नेत्याने नुकत्याच केलेल्या टिप्पणीवर प्रसाद यांनी ताशेरे ओढले. भाजप विरोधकांच्या या युतीला एक स्पष्ट ठराव मांडण्यास भाग पाडले, असेही प्रसाद पुढे म्हणाले.

दुसरीकडे, द्रमुकने आपल्या टीकेचे समर्थन करण्यासाठी सनातन धर्माचा हिंदूंमधील जातीय भेदभावाशी संबंध जोडला. यावरही प्रसाद यांनी निशाणा साधला.

प्रसाद म्हणाले की, शब्बीर, केवट आणि संत रविदास यांसारख्या महान संतांनी मागास जातीमधील लोकांसाठी मंदिरे बांधली. सनातन धर्माचा असा विश्वास आहे की, कोणतीही व्यक्ती त्याच्या भक्तीने त्याची जात-पात आणि सामुदायिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी ईश्वर प्राप्ती करु शकतो.' तर दुसरीकडे, प्रत्येक धर्माचा आदर करणे यावर कॉंग्रेसचा विश्वास आहे.

प्रसाद पुढे असेही म्हणाले की, द्रमुकपासून ते राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) अशा काही पक्षांचे नेते सनातन धर्म आणि हिंदू धर्माशी संबंधित पवित्र ग्रंथांवर टीका करत आहेत.

त्यांना इतर धर्मांवर आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांवर टीका करायला आवडते का? असाही सवाल त्यांनी यावेळी विचारला.

भारताच्या संस्कृतीचा आणि वारशाचा दररोज अपमान केला जात आहे, असे सांगून प्रसाद म्हणाले की, भाजप या मुद्द्यावरुन गावागावांत पोहोचेल आणि विकास आणि आपल्या वारशाबद्दल अवगत करेल.

सनातन धर्माचा अपमान का केला जात आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही, असेही प्रसाद पुढे म्हणाले. भारताने नुकत्याच आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेत कोणार्क चक्र आणि प्राचीन नालंदा विद्यापीठाला दिलेल्या महत्त्वाविषयीही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT