Couple Dainik Gomantak
देश

Bihar News: भाच्याने पळवलं मामीला, मुलांच्या आठवणीत परतलेल्या बायकोला नवरा म्हणाला...

Bihar News: बिहारमधील भागलपूरमधून विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला आपल्या भाच्याच्या प्रेमात पडली.

Manish Jadhav

Bihar News: बिहारमधील भागलपूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला आपल्या भाच्याच्या प्रेमात पडली. मामीचं भाच्यावरील प्रेम इतकं डोक्यात गेलं की, सगळं सोडून ती त्याच्यासोबत पळून गेली.

भाच्याच्या प्रेमापोटी ती पती आणि दोन मुलांना सोडून पळून गेली. आता ती महिला आपल्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तिने आता पती आणि मुलांसोबत राहणार असल्याचे सांगितले.

खरे तर, चार महिन्यांपूर्वी भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजच्या मिरहट्टी गावात राहणाऱ्या एका महिलेचं (Women) तिच्या भाच्यावर प्रेम होतं. यानंतर भाच्याने तिला आयुष्यभर पत्नी म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले.

पतीने परतण्याची विनंती केली होती

महिलेच्या पतीने तिचा खूप शोध घेतला. नंतर त्याला कळले की, ती त्याच्या भाच्याबरोबर पळून गेली. त्यानंतर पतीने पत्नीला फोन करुन घरी परतण्याची विनंती केली. त्याने आपल्या दोन मुलांकडे लक्ष दिले, परंतु आपल्या भाच्याच्या प्रेमात ती पुरती वेडी झाली होती.

मला माझ्या मुलाची आठवण आल्यावर मी घरी परतले

इकडे चार महिन्यांनी जेव्हा मामीच्या डोक्यात प्रेमात पडण्याचा परमानंद शांत झाला तेव्हा तिला आपल्या मुलाची आठवण येऊ लागली. यानंतर ती आपल्या पतीच्या घरी परतली. घरी परतल्यानंतर तिच्या पतीने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

एवढेच नाही तर तिला घरातही प्रवेश दिला नाही. त्यानंतर पत्नीने हाय व्होल्टेज ड्रामा केला. तिने पतीच्या घरासमोर मोठा गोंधळ घातला. महिलेने सांगितले की, ती कोणाशीही पळून गेली नसून ती स्वत:च्या इच्छेने फिरायला गेली होती. हे माझेही घर आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येथून जाणार नाही.

पतीने साथ देण्यास नकार दिला

इकडे गावातील लोक नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की, ती परत आल्यानंतर तिला स्वीकार. ज्येष्ठ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मुले आणि कुटुंबाचा हवाला देत पत्नीला परत स्वीकारण्यासाठी पतीला राजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ये

थे पतीने पत्नीला परत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की, जी स्त्री घराची मान-मर्यादा विसरली तिला मी स्वीकारु शकत नाही. जिला स्वतःच्या मुलांच्या काळजी नाही तिला मी कसं स्वीकारु ते तुम्हीच सांगा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

Priol: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

SCROLL FOR NEXT