Bihar News: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचा संताप, प्रियकराशी लग्न लावून देत...

Marriage: महिलेच्या पतीला कळताच त्याने दोघांनाही मंदिरात नेले आणि जबरदस्तीने लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Marriage
MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar News: बिहारच्या नवादा जिल्ह्यात एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. महिलेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरी पोहोचला तेव्हा घरच्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. यानंतर त्याने प्रियकराला बेदम मारहाण करुन ओलीस ठेवले. महिलेच्या पतीला कळताच त्याने दोघांनाही मंदिरात नेले आणि जबरदस्तीने लग्न लावून दिले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, हे प्रकरण बिहारच्या (Bihar) नवादा जिल्ह्यातील नर्दीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कहुआरा गावाशी संबंधित आहे. येथे एक व्यक्ती काही कामानिमित्त रात्री उशिरा बाहेर गेला, तेव्हा त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी पोहोचला.

नातेवाईकांनी दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली, त्यानंतर त्यांना ओलीस ठेवले. ही बाब महिलेच्या पतीला कळताच तो संतापला. घरी परतल्यावर त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला जबरदस्तीने मंदिरात नेले, जिथे त्यांचे लग्न लावून दिले.

Marriage
Bihar Crime: जवानाने पत्नीसह दोन महिन्यांच्या तान्ह्या बाळाला जिवंत जाळले, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

लग्नानंतर गावकऱ्यांनी दोघांना गावातून हाकलून दिले

मंदिरात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या विवाहावेळी आजूबाजूचे लोकही उपस्थित होते. या घटनेनंतर गावकऱ्यांनी दोघांनाही गावातून हाकलून दिले. या संपूर्ण प्रकरणात ग्रामस्थ आणि महिलेचा पती काहीही बोलायला तयार नाहीत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Marriage
Bihar Crime: इन्स्टाग्रामवरील प्रेमाची किंमत तब्बल 50 लाख; प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराचे अपहरण

व्हायरल व्हिडिओबाबत अधिकारी काय म्हणाले?

महिलेचा प्रियकर नवादा येथील नर्दीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील मपना गढिया गावचा रहिवासी आहे. तो विवाहित असून तो 3 मुलांचा बाप आहे. दुसरीकडे, महिला कहुआरा गावची रहिवासी आहे, तिला दोन मुलेही आहेत.

या प्रकरणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही बाब निदर्शनास आली आहे, मात्र अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही आणि एफआयआरही (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच आता काही सांगता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com