Bankipur Assembly Election Dainik Gomantak
देश

Bankipur Assembly Election: बिहार पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का! बांकीपूरमधून जनसुराजचे प्रशांत किशोर विजयी; पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश

BJP Defeat Bihar: बांकीपूर आणि पाठोपाठ दातियाची निवडणूक विशेष चर्चेत आली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी चमकदार विजय मिळवीत पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला असून, भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेविरोधात जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचे प्रतिबिंब या निकालात दिसल्याची प्रतिक्रिया विरोधकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूरच्या जागा काँग्रेस आणि भाजपने राखल्या आहेत. या तिन्ही मतदारसंघामध्ये ३० जुलै रोजी मतदान झाले होते. यातील बांकीपूर आणि पाठोपाठ दातियाची निवडणूक विशेष चर्चेत आली होती.

नितीन नवीन यांच्या राजीनाम्यानंतर बांकीपूरची निवडणूक होत असतानाच, प्रशांत किशोरही रिंगणात उतरले. या मतदारसंघात १९९५पासून भाजपचा उमेदवार विजयी होत आला आहे आणि नितीन नवीनही पाच वेळा विजयी झाले होते. भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलत नीरजकुमार सिन्हा यांना संधी दिली.

मात्र, प्रचारात सुरुवातीपासूनच जनसुराज पक्षाने आघाडी घेतली होती. ‘बांकीपूरमध्ये भाजपच्या तिकीटावर कुत्री-मांजरेही जिंकतील, असा भाजप नेते दावा करीत आहेत,’ असा प्रचार प्रशांत किशोर यांच्या विजयात हातभार लावणारा ठरला. किशोर यांच्या या आरोपाचे भाजपकडून खंडन केले गेले नाही.

भाजप आणि काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे दातियाच्या निवडणुकीकडेही लक्ष लागले होते. या मतदारसंघात विजयी झालेले काँग्रेसचे राजेंद्र भारती बँक गैरव्यवहारात तीन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे अपात्र ठरल्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली.

काँग्रेसचे कुंवर घनश्याम सिंह यांनी भाजपचे आशुतोष तिवारी यांचा ६०१६ मतांनी पराभव केला. मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये, तर काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे राजेंद्र भारती यांच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बंडाळी माजली होती.

बांकीपूर (बिहार)

६४,१५१

प्रशांत किशोर, जनसुराज पक्ष

४४,८२७

नीरजकुमार, भाजप

१४,२७३

रेखाकुमारी, राजद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT