PoK Election Violence: "गोळीबार, हत्या अन् मतपेट्यांची जाळपोळ!" पीओकेत निवडणुकीदरम्यान रक्तापात; पोलिसांच्या फायरिंगमध्ये 9 जणांचा मृत्यू

POK Assembly Election Violence 9 Dead: पाक व्याप्त काश्मीरमधील तथाकथित विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच प्रचंड हिंसाचार, गोळीबार आणि बोगस मतदानाचा नंगानाच पाहायला मिळाला.
POK Assembly Election Violence 9 Dead
PoK Election ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

POK Assembly Election Violence 9 Dead: पाक व्याप्त काश्मीरमधील तथाकथित विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच प्रचंड हिंसाचार, गोळीबार आणि बोगस मतदानाचा नंगानाच पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्यात मीरपूर विभागातील 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, मतदान सुरु होताच अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कोटली आणि भिंबरसह अनेक भागात संतप्त जमावाने मतपेट्या पळवून नेवून पेटवून दिल्या.

वाढत्या हिंसाचारामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया अर्ध्यातच गुंडाळावी लागली. या संपूर्ण गोंधळात पोलिसांच्या (Police) गोळीबारात आणि हिंसक चकमकीत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

POK Assembly Election Violence 9 Dead
''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

या निवडणुकीतील सर्वात भयंकर घटना कोटली जिल्ह्यात घडली, जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) आणि विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट गोळीबार झाला. या गोळीबारात पीपीपीचा कार्यकर्ता मुख्तार युनूस याचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात भीषण तणाव निर्माण झाला. पीपीपीने राजकीय विरोधकांवर हत्येचा थेट आरोप केला. एवढेच नव्हे तर 'एलए-1' मीरपूरमधील युनियन कौन्सिल ओनाहच्या पोलिंग स्टेशनवर बंदुकधाऱ्यांनी हल्ला करुन मतमोजणीत मोठा अडथळा आणल्याची तक्रार पीपीपीने निवडणूक आयोगाकडे केली. राजकीय गुंडांनी सर्रास शस्त्रे उगारुन मतदारांना धमकावल्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले.

POK Assembly Election Violence 9 Dead
POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

या सर्व प्रकारामुळे पीपीपीसह अनेक प्रमुख राजकीय पक्षांनी आणि स्थानिक नागरी संघटनांनी या निवडणुकांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रियेत उघडपणे धांदल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. वाढता हिंसाचार रोखण्यात आणि मतपेट्यांचे रक्षण करण्यात सुरक्षारक्षक पूर्णपणे अपयशी ठरल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निष्पक्ष मतदानाचे दावे करणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या नाकाखाली झालेल्या या भीषण रक्तपातामुळे संपूर्ण पीओकेमध्ये दहशतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com