CJP Protest: दिल्लीत मोर्चाला अद्याप परवानगी नाहीच, संसदेवर धडक देण्याचा 'कॉक्रोच जनता पार्टी'चा निर्धार कायम

Cockroach Janata Party Delhi Protest Parliament March: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने उद्या (ता. २०) ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केल्यानंतर नवी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.
Cockroach Janta Party Delhi Protest
Cockroach Janta Party parliament marchDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने उद्या (ता. २०) ‘चलो संसद’ मोर्चाची घोषणा केल्यानंतर नवी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले असून दिल्लीत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहनांचीही कसून तपासणी सुरू केली जात आहे.

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’चे जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी १९ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर पोलिसांनी काल (ता. १८) त्यांना ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते.

Cockroach Janta Party Delhi Protest
Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

वांगचुक यांच्यावर ‘सफदरजंग’मध्येच उपचार

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांमध्ये हस्तक्षेप करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी नकार दिला. उपोषण करत असलेल्या वांगचुक यांना जंतरमंतरवरून सरकारी रुग्णालयात हलविण्याचा सरकारचा निर्णय मनमानी असल्याचे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Cockroach Janta Party Delhi Protest
Goa Monsoon: 49 दिवसांतील पावसापैकी 50 टक्‍के केवळ 8 दिवसांत, आतापर्यंत 38.93 इंचांची नोंद; तूट 37 टक्‍क्‍यांवर

‘वांगचुक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि संमतीशिवाय १८ जुलै रोजी आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन कुटुंबाच्या पसंतीच्या रुग्णालयात हलविण्याचे निर्देश द्यावेत,’ अशी मागणी त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com