Bengaluru Accident Dainik Gomantak
देश

Bengaluru Accident: बंगळुरुत भीषण दुर्घटना! काम करत असताना 40 फूट उंचीवरुन कोसळला भलामोठा दगड; 9 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Bengaluru Stone Quarry Accident: बंगळुरु येथील मदापटना भागात एक काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली.

Manish Jadhav

Bengaluru Stone Quarry Accident: बंगळुरु येथील मदापटना भागात एक काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली. येथील एका दगडाच्या खाणीत नेहमीप्रमाणे काम करत असलेल्या मजुरांवर अचानक एक भलामोठा दगड कोसळला. या भीषण अपघातात 9 कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व मजूर बिहार आणि आसामचे रहिवासी होते. ते येथे रोजंदारीवर खडी आणि दगड फोडण्याचे काम करत होते. अपघात घडला त्यावेळी सर्व मजूर खाणीत काम करत होते, ज्यामुळे त्यांना तिथून पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

खाणीतील एका प्रत्यक्षदर्शी मजुराने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी तिथे सुमारे 18 मजूर काम करत होते. अचानक एक भलामोठा अंदाजे 40 फूट उंचीवरुन दगड कोसळला. इतक्या प्रचंड उंचीवरुन कोसळलेल्या वजनी दगडामुळे मजुरांना जीव वाचवण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत जे मजूर गंभीर जखमी झाले, त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमींचा अचूक आकडा अद्याप समोर आला नसला, तरी अनेक मजुरांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केले. ढिगारा हटवण्याचे काम सुकर व्हावे यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली.

या काळीज हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी सर्व मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरु केली असून, त्यांच्या मूळ गावी कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच हा दगड नेमका कशामुळे कोसळला, याचा सखोल तपास पोलिसांनी सुरु केला. खाण व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही, याचीही चौकशी केली जात असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी मृत कामगारांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमी मजूर लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण मदापटना परिसरात सध्या अत्यंत शोकाकुल आणि तणावाचे वातावरण पसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: व्यवसाय, नोकरी अन् बँक बॅलन्स..! मंगळाचे नक्षत्रांतर 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

SCROLL FOR NEXT