Azam Khan Dainik Gomantak
देश

Azam Khan: आझम खानसह पत्नी आणि मुलाला 7 वर्षांची शिक्षा, जन्म प्रमाणपत्र प्रकरणात मोठा झटका!

Birth Certificate Course: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Manish Jadhav

Birth Certificate Course: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

यातच आता रामपूर न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही न्यायालयातून थेट जेलमध्ये जाणार आहेत. हे संपूर्ण प्रकरण अब्दुल्ला आझम खान यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित असून भाजप नेते आकाश सक्सेना यांनी 2019 मध्ये तक्रार दाखल केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण

वास्तविक, आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यावर दोन भिन्न जन्म प्रमाणपत्रे असल्याचा आरोप होता. 28 जून 2012 रोजी रामपूर नगरपालिकेने प्रमाणपत्र जारी केले होते, ज्यामध्ये रामपूर हे अब्दुल्ला यांचे जन्मस्थान दाखवण्यात आले होते.

तर दुसरे जन्म प्रमाणपत्र जानेवारी 2015 मध्ये देण्यात आले, ज्यामध्ये अब्दुल्ला यांचे जन्मस्थान लखनऊ दाखवण्यात आले आहे. एवढेच नाही तर अब्दुल्ला आझम यांच्यावर जन्म प्रमाणपत्राच्या आधारे पासपोर्ट (Passport) घेऊन परदेशात गेल्याचा आरोप आहे. सरकारी कामासाठी दुसरा जन्माचा दाखला वापरल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल करण्यात आला

हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्यावर सुनावणी सुरु झाली आणि अब्दुल्ला यांनी सादर केलेले जन्म प्रमाणापत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांची स्वार मतदारसंघातील निवडणूक रद्द झाली.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल्ला आझम हे रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते, परंतु फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात (Court) खटला दाखल करण्यात आला होता.

तिघांविरुद्ध कलम 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता न्यायालयाने 18 ऑक्टोबर रोजीच तिघांनाही याच प्रकरणात दोषी घोषित केले आहे.

तिघांनाही आरोपी करण्यात आले

या प्रकरणी अब्दुल्ला आझम, त्यांचे वडील आझम खान आणि आई तंजीम फातिमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामपूरच्या एमपीएमएलए न्यायालयाने तिघांनाही फसवणुकीत दोषी ठरवले आहे.

या तिघांना कलम 467 आणि कलम 468 अन्वये सात आणि तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सर्व शिक्षा एकत्र चालतील. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने तिघांनाही दोषी ठरवून ताब्यात घेतले होते, तिघांनाही न्यायालयातून थेट कारागृहात पाठवण्याची तयारी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT