Azam Khan Controversial Statement: 'मृतदेहाचा तुकडाही सापडला नाही...,' आझम खान यांचं राजीव गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य

Azam Khan Controversial Statement: आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सपा नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
SP leader Azam Khan
SP leader Azam KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Azam Khan Controversial Statement: आपल्या प्रक्षोभक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सपा नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देवाचा बदला खूप क्रूर आहे, असे आझम खान म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना आझम म्हणाले की, 'राजीव गांधींच्या मृतदेहाचा तुकडाही सापडला नाही, ज्यांचे एकेकाळी सर्वाधिक खासदार होते.'

आझम खान हे रामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार फातिमा जबी यांचा प्रचार करत होते.

निवडणूक प्रचारादरम्यान आझम खान म्हणाले की, मी इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) काळ पाहिला आहे. राजीव गांधींच्या सरकारमध्ये सर्वाधिक खासदार होते, पण त्यांच्या शरीराचा तुकडाही कसा सापडला नाही ते पाहा.

SP leader Azam Khan
Azam Khan यांचे पुत्र अब्दुल्ला खान यांना आणखी एक झटका! भाजप आमदाराच्या तक्रारीवर मोठी कारवाई

भाजप सरकारवर टीकास्त्र डागले

सध्या आझम खान यूपीच्या नागरी निवडणुकांसंदर्भात सपा उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री मोहम्मद आझम खान शनिवारी रामपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. भाजप (BJP) सरकारवर टीकास्त्र डागताना आझम यांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

SP leader Azam Khan
Abdullah Azam Khan: आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला खान यांना मोठा झटका, आमदारकी हिरावली

आझम यांच्यावर 2017 नंतर 90 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत

2017 मध्ये योगी सरकार सत्तेत आल्यानंतर सपा नेते आझम खान यांच्यावर 90 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभा सचिवालयाने आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले होते.

खान यांनी एप्रिल 2019 मध्ये निवडणूक रॅलीदरम्यान रामपूरमध्ये नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी, पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्या विरोधात टिप्पणी केल्याबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com