MP MLA court On Azam Khan Hate Speech: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रामपूरचे माजी आमदार, समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आझम खान यांना हेट स्पीच प्रकरणात आमदारकी गमवावी लागली होती.
आता रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने या हेट स्पीच प्रकरणात आझम खान यांच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने (Court) सपा नेते आझम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत सत्र न्यायालयाने आझम खान यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
यावेळी आझम खान यांचे वकील विनोद शर्मा म्हणाले की, न्यायालयाने आझम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे, असे अपील आम्ही यापूर्वी केले होते. आता न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला आहे.
हे प्रकरण 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराशी संबंधित आहे. यादरम्यान आझम खान यांच्यावर आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजप नेते आकाश सक्सेना यांनी रामपूर न्यायालयात ही तक्रार केली होती.
त्यानंतर, न्यायालयाने आझम खान यांना दोषी ठरवले होते. 2022 मध्ये 27 ऑक्टोबर रोजी रामपूर न्यायालयाने आझम यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर, आझम खान यांना आमदारकी गमवावी लागली होती.
मात्र शिक्षा झाल्यानंतर आझम खान यांना जामीन मिळाला. यानंतर, रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली, ज्यामध्ये भाजप नेते आकाश सक्सेना मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
आता न्यायालयाच्या निर्णयानंतर आझम खान यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. न्यायालयाने खान यांना आरोपातून मुक्त केले.
विशेष म्हणजे, 2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि आझम खान यांच्यासाठी ही सकारात्मक बातमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.