ISRO Dainik Gomantak
देश

ISRO: ‘इस्रो’च्या प्रक्षेपकाचे स्वयंचलित लँडिंग यशस्वी

‘चिनूक’च्या साह्याने चाचणी; पुनर्वापरयोग्य प्रक्षेपकाच्या दिशेने पाऊल

दैनिक गोमन्तक

ISRO: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज ‘रियुजेबल लाँच व्हेईकल’चे ‘ऑटोनॉमस लँडिंग मिशन’ (आरएलव्ही एलईएक्स) यशस्वीपणे राबविले. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज येथेही चाचणी घेण्यात आली. या चाचणीद्वारे ‘इस्रो’ने प्रक्षेपकाचे स्वयंचलित पद्धतीने लँडिंग करण्यात यश मिळविले आहे.

तसेच, यामुळे पुनर्वापर करता येणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ‘इस्रो’ने एक दमदार पाऊल टाकले आहे, असे ‘इस्रो’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या चाचणीसाठी विविध उच्च तंत्रज्ञानांचा वापर केला गेला. त्यातील काही तंत्रज्ञान ‘इस्रो’नेच विकसित केले होते. डिजिटल इलेव्हेशन मॉडेलमुळे अवकाश विमानाच्या उंचीचा अचूक अंदाज येत होता.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर

  • अत्यंत अचूक नेव्हिगेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर

  • सुडोलाइट सिस्टीम (हवेतील स्थान अचूकपणे निश्‍चित करण्यासाठी)

  • का-बँड रडार अल्टीमीटर

  • नाविक (NavIC) रिसिव्हर

  • स्वदेशी बनावटीचे लँडिंग गिअर

  • एअरोफॉइल हनीकोम्ब फिन्स

  • ब्रेक पॅराशूट सिस्टीम

  • डिजिटल एलिव्हेशन मॉडेल

  • अत्यंत कमी खर्चात प्रयोग यशस्वी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT