Canacona News : भातू गावकर यांचे घराचे स्वप्न होणार साकार

सभापती रमेश तवडकर यांचा पुढाकार : श्रमधाम योजनेतून पक्के घर बांधून देणार
Bhatu Gaokar
Bhatu GaokarGomantak Digital Team

काणकोण : ही व्यथा आहे गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील बडसरे गावातील भातू गावकर या विधवा महिलेची. गेली पन्नास वर्षे ती पक्क्या घरापासून वंचित राहिली आहे. भार्स वाड्यावर तिला लग्न करून देण्यात आले. मात्र, तिचे नशिबच कमनशिबी ठरले. लग्न होऊन तीन महिन्यांतच तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपल्या वडिलांच्या घरात आसरा घेतला. तिच्या तीन भावांनी तिचा सांभाळ केला.

मात्र, आपला भार भावांवर नको म्हणून तिने आपल्या वडिलोपार्जित जमिनीत एक खोपटे उभारले. परंतु दुर्दैवाचा फेरा तिच्या नशिबी चुकला नाही. एका वादळी वाऱ्यात जवळच असलेला एक अवाढव्य काजू वृक्ष तिच्या खोपटावर कोसळून खोपटे जमिनदोस्त झाले. ते खोपटे पूर्ववत उभारणे तिला शक्य झाले नाही आणि त्याच जमिनदोस्त झालेल्या खोपटात सुमारे सत्तर वर्षीय भातू सुमारे पन्नास वर्षे आपले जीवन कंठीत आहे.

तिची ही व्यथा स्थानिक कार्यकर्त्यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या कानावर घातली व लागलीच सभापती रमेश तवडकर यांनी शनिवारी तिच्या जमिनदोस्त झालेल्या खोपटाला स्थानिक कार्यकर्त्यांसह भेट देऊन श्रमधाम योजनेतून तिला पक्के घर उभारून देण्याचा निर्णय घेतला.

Bhatu Gaokar
Virdi Dam Dispute: आता ‘वाळवंटी’वर संकट;विर्डी धरणाचे काम सुरू

५० वर्षे पक्क्या आसऱ्याविना !

भातू गावकर ही पतीच्या निधनानंतर खचली मात्र तिने धीर सोडला नाही. कुणी आजारी होऊन इस्पितळात उपचार घेत असल्यास त्यांची देखभाल करण्याचे काम ती करत होती आणि आपला दैनंदिन खर्च भागवत होती. मात्र, आता शरीर थकल्यामुळे तिला ते काम करणे शक्य होत नाही. गेली ५० वर्षे ती पक्क्या आसऱ्याविना दिवस कंठीत आहे.

सभापती रमेश तवडकर यांनी भेट घेऊन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ज्यांनी या कामात पुढाकार घेतला आहे त्या सर्वांचे भले होवो हा शुभाशीर्वाद देणेच माझ्या हाती आहे.

भातू गावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com