Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

Punjab Election: जालंधरच्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले...'नया पंजाब कर्जमुक्त होणार'

दैनिक गोमन्तक

देशात आज गोवा, उत्तराखंडमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तर उत्तरप्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. तर 20 फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान पार पडणार आहे. याच पाश्वभूमीवर पंजाबमधील जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पहिली प्रचारसभा घेतली. यामध्ये त्यांनी पंजाबचा विकास हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणत नवा पंजाब हा कर्जमुक्त आम्ही करणार आहोत. (At a meeting in Jalandhar Prime Minister Modi said that the new Punjab would be debt free)

दरम्यान, पंजाबमध्ये भाजपने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्यांशी युती केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान मोदींची ही पहिलीच रॅली आहे. याआधी फिरोजपूरमध्ये पीएम मोदींची निवडणूक रॅली होऊ शकली नाही. शेतकरी आंदोलनामुळे त्यांना रॅली अर्धवटच सोडून परतावे लागले होते.

पंजाबमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार असून राज्यात विकासाचा नवा अध्याय सुरु होईल, असा दावा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. ते पुढे म्हणाले, 'मी पंजाबच्या प्रत्येक व्यक्तीला आश्वासन देण्यासाठी आलो आहे की, तुमच्या विकासासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही.'

'पंजाबशी माझे जुने नाते आहे. नवा पंजाब घडविण्याचा आम्ही निर्धार केला आहे. विशेषत: तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नसल्याचे मोदींनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांनाही श्रद्धांजली वाहिली. 'जेव्हा नवा पंजाब होईल तेव्हाच न्यू इंडियाची निर्मिती होईल,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नवा पंजाब कर्जमुक्त होईल, संधींनी परिपूर्ण असेल, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, नव्या पंजाबमध्ये वारसाही असेल, विकासही होईल. तसेच नव्या पंजाबमध्ये भ्रष्टाचार आणि माफियांनाही थारा आम्ही देणार नाही. शिवाय पंजाबमध्ये कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठीही आम्ही प्रयत्नरत असणार आहोत.

शेवटी पीएम मोदी म्हणाले की, 'पंजाब बदलासाठी अभूतपूर्व उत्साह दाखवत आहे. पंजाबमध्ये विभाजनाऐवजी जनता विकासासाठी उभी राहिली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT