Punjab Election: पंजाबमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

कॉंग्रेस पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार 6 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाब विधानसभा निवडणुका (Punjab Election 2022) जवळ आल्या आहेत. पक्षांनी उमेदवारांच्या घोषणेसाठी राजकीय हालचालींना वेग दिला आहे. आम आदमी पक्षानेही पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलत्या निवडणूक समीकरणांदरम्यान, काँग्रेस (Congress) पक्ष 6 फेब्रुवारीला आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करेल.

दरम्यान, कॉंग्रेसकडून पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे दोन प्रमुख दावेदार आहेत. उमेदवार निवडीसाठी काँग्रेस टेली पोल प्रक्रियेचा अवलंब करत आहे. यामध्ये त्यांच्या पसंतीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत. उमेदवार निवडीसाठी पक्षाने कार्यकर्त्यांची मतेही मागवली आहेत.

Congress
Punjab Assembly Election साठी भाजपची दुसरी यादी जाहीर

तसेच, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची तुमची मागणी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु, असे राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले होते. सामान्यत: आम्ही मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करत नाही, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांना हवे असल्यास आम्हीही चेहरा जाहीर करु. मात्र त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा सल्ला विचारात घेणे आमच्यासाठी आवश्यक असणार आहे. तेच पंजाबसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com