Assam Rifles Dainik Gomantak
देश

Mizoram: आसाम राइफल्सने मिझोराममधून जप्त केले 5 कोटींचे हेरॉइन

Mizoram: या जप्तीदरम्यान म्यानमारच्या एका नागरिकाला देखील अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Mizoram: भारताच्या ईशान्येकडील राज्यात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता दिसून येत आहे. मणीपूरमध्ये दोन जमातीच्या संघर्षामुळे अतिशय वाईट घटना घडल्याचे समोर आले होते. आता मिझोराममध्ये आसाम राइफल्सने पाच करोडपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त केल्याची माहीती समोर आली आहे.

भारत म्यानमार सीमेवरील ड्रग्ज तस्करी हा भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, गेल्या चार वर्षात आसाम राइफल्सने 4200 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची माहीती दिली आहे.

आसाम राइफल्सचे महानिर्देशक पी सी नायर यांनी एका मुलाखतीत ड्रग्ज तस्करीबद्दल ही माहीती दिली आहे. ते म्हणतात, आसाम राइफल्सने सीमारक्षणासोबतच ड्रग्ज आणि अवैध शस्रसाठा जप्त करण्याचा अभियान राबवले आहे. या अभियानातंर्गत गेल्या चार वर्षात 4267 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहीती या मुलाखतीत पी सी नायर यांनी दिली आहे.

आसाम राइफल्सने उत्पाद शुल्क आणि नारकोटिक्स विभाग यांच्याबरोबर संयुक्त अभियान राबवत मिझोरामच्या चंपाई जिल्ह्यातील बेथेलवेंगमधून 5 कोटीपेक्षा अधिक हेरॉइनचा साठा जप्त केला आहे. या जप्तीदरम्यान म्यानमारच्या एका नागरिकाला देखील अटक केली आहे.

महत्वाचे म्हणजे हे ड्रग्ज साबणाच्या डब्यात लपवून आणले होते. याची किंमत 5.96 कोटी इतकी असल्याचे म्हटले जात आहे. आता पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT